घरताज्या घडामोडीLive Updates: नागपुरात मानलेल्या बहिणीसोबत बोलला म्हणून केला तरुणाचा खून

Live Updates: नागपुरात मानलेल्या बहिणीसोबत बोलला म्हणून केला तरुणाचा खून

Subscribe

मानलेल्या बहिणीसोबत का बोलतो एवढ्या रागातून एका गुंडाने नागपुरात ३० वर्षीय विवाहित तरुणाचा खून केला. आहे,यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत आज सकाळी माजरी रेल्वे अंडर ब्रिज जवळ झाली हत्येची घटना, किशोर नंदनवार असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शेख सिराज उर्फ शेरखान असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


“सर्वांची भाषणे ऐकली साधारण वयाच्या दहाव्या वर्षापासून जे काही चित्र होतं ते माझ्या डोळ्यासमोर चालले होते. ५० वर्ष पवार साहेबांचा कार्यकाळ डोळ्यांसमोरुन गेला. पण ही सगळ्या नेत्यांची भाषणे ऐकत असताना जे आधी कधी ऐकलं नव्हतं ते आज मी ऐकलं. मी लहानाचा मोठा आजी आजोबांकडे झालो पण त्यांनी कधी मला याची माहिती दिली नाही. मी सुप्रियाला म्हटलं, हे कधी घडलेलं बाई पण बोलल्या नाही आणि आबा पण बोलले नाही, कसं गं? तेव्हा सुप्रिया मला म्हणाली गप्प बस आणि ऐक, असं तिने म्हटलं. शेवटी बहिणेने सांगितलं म्हटल्यावर शांत ऐकावं लागलं,” असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

मनसे-भाजपा युतीच्या चर्चेवर राऊत म्हणाले,जाऊद्या ना, कुणीही कुणाबरोबर गेलं, तरीही मुंबई महापालिका ही शिवसेनेकडेच राहिल. पुढचा नाशिकचा महापौर शिवसेनेचाच असेल,” असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघाच्या (FICCI) ९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटन सत्र आणि डिजिटल माध्यमातून देशाला संबोधित केले. यावेळी मोदी यांनी कृषी कायद्यांवर भाष्य केले. नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे, असे मोदी म्हणाले. कृषी पायाभूत सुविधा, साठा, कोल्ड साखळी दरम्यानचे अडथळे आता दूर केले जात आहेत. कृषी कायद्यांच्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना नवीन पर्याय उपलब्ध होतील आणि त्यांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल. त्याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होईल. शेतकर्‍यांना शेती कायद्याद्वारे आपली पिके बाजाराबाहेर विकण्याचा पर्याय उपलब्ध होत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे, असे मोदी म्हणाले. सविस्तर वाचा

- Advertisement -

नाशिकमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. दरवाढ मागे घ्या अन्यथा मोठं आंदोलन छेडणार, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेच्यावतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालया बाहेर आंदोलन करण्यात येत आहे. मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी तसेच रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील केला निषेध करण्यात आला.


ब्रिटननंतर आता अमेरिकेनंही अमेरिकन कंपनी फायझर आणि जर्मन फार्मा कंपनी बायोएनटेकद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या कोरोना लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली आहे. सुरूवातीपासूनच अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसल्याचं दिसत आहे.


देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३० हजार ५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात ९८ लाख २६ हजार ७७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ९३ लाख २४ हजार ३२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ३ लाख ५९ हजार ८१९ सक्रिय रुग्ण आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, १२ डिसेंबरला औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करणार असून या दौऱ्यात मुख्यमंत्र्याच्या हस्ते औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी दुपारी १२.१५ वाजता मुंबईहून शासकीय विमानाने औरंगाबादकडे प्रयाण करतील. दुपारी दीड वाजता चिकलठाणा येथील गरवारे स्टेडियममध्ये औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचे प्रत्यक्ष भूमिपूजन होईल. त्याचबरोबर हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे उद्घाटन व त्याअंतर्गत जंगल सफारी पार्कचे आभासी पद्धतीने उद्घाटन होईल. याशिवाय औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभही या दौऱ्यात होणार आहे.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -