घरताज्या घडामोडीLive Updates: राज्य विधीमंडाळाचे पुढील अधिवेशन १ मार्च २०२१ला होणार

Live Updates: राज्य विधीमंडाळाचे पुढील अधिवेशन १ मार्च २०२१ला होणार

Subscribe

राज्य विधीमंडाळाचे पुढील अधिवेशन १ मार्च २०२१ला होणार


कोरोना डोस घेतलेल्या हरियाणाच्या आरोग्य मंत्र्यांची प्रकृती खालावली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. दुसरा डोस देण्याआधीच प्रकृती खालावली आहे. त्यांना गुरूग्राम रूग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले आहे.

- Advertisement -

रिपब्लिक चॅनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  महानगर दंडाधिकाऱ्यांनी ही सुनावणी केली आहे.


गृहमंत्र्यांकडून विधानसभेत ‘शक्ती विधेयक’ सादर करण्यात आले.

- Advertisement -

ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंच सोडत जाहीर होणार

राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या १४ हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. मात्र या संदर्भात एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार आहे. ज्या आठ जिल्ह्यात निवडणुकीआधीच सरपंचपदाचं आरक्षण जाहीर झालेलं होतं, तेही या नव्या निर्णयामुळे रद्द झालं आहे. ग्रामविकास विभागाने आरक्षण सोडतीचा निर्णय घेतल्यानंतर संबंधित जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश काढून जुनं आरक्षण रद्द केलं आहे.


देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पूर्णतः संपलेला नाही. या कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या भितीमुळे यंदा होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नसल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.  (सविस्तर वाचा)

प्रताप सरनाईक यांनी कंगना रणौत आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात अवमानाच्या प्रकरणात विशेषाधिकार समितीला अहवाल सादर करण्याकरिता पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देण्यासाठीचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर

हिवाळी अधिवेशन: विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन सुरू

आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. दरम्यान आज महत्वाच्या विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता असून मराठा आरक्षण, कोरोना, शेतकरी मदतीवरुन विरोधक आक्रमक होताना दिसताय. विधी मंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी त्यांच्या आंदोलनाला सुरूवात केली आहे.


देशात कोरोना बाधितांचा आकडा ९९ लाख ६ हजार १६५ वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासात २२ हजार ०६५ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ३५४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासाठी गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तसे निर्देश केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये कोरोना लसीकरण कशा प्रकारे केले जाणार, तसेच याची संपूर्ण नियमावली राज्यांना पाठवली आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले होते की, कोरोना लस आल्यानंतर ती लोकांपर्यंत कशी पोहोचवण्यात येईल, यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे.


जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहेत. अशात एक दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने Pfizer-BioNtech च्या कोरोना लसीच्या इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर सोमवारपासून लसीकरणाला सुरु झालं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -