Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Covid-19 vaccine : लस घ्या, अन् मिळवा डोनट, पॉपकॉर्न, चिल्ड बिअर आणि...

Covid-19 vaccine : लस घ्या, अन् मिळवा डोनट, पॉपकॉर्न, चिल्ड बिअर आणि सुट्टीही !

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोनाचा मुक्काम वाढलेला असतानाच आता अनेक देशांनी प्रतिबंधात्मक उपाय असलेल्या covid-19 लसीकरणाच्या मोहीमेला प्राधान्य दिले आहे. पण अनेक देशांमध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांना आकर्षित करण्यासाठी आता अनेक शकला लढवण्यात येत आहेत. काही ठिकाणी कोरोनाविरोधातील लसीकरण वाढावे म्हणून मोफत डोनट, पॉपकॉर्न, सिनेमाचे तिकीट, व्हिडिओ गेम्स, कॉफी, भरपगारी रजा, पैसे देण्यापासून ते बिअर अशा अनेक भरघोस आफर्सचा वर्षाव सध्या अमेरिकेत नागरिकांसाठी केला जात आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या नागरिकांना लस घेतल्यावर थेट ५०० डॉलर्सची देण्याचीही घोषणा केली आहे. तर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना गिफ्ट कार्ड देऊ केले आहेत. अनेक कंपन्यांमध्ये कामगार कामासाठी परत यावे म्हणूनच अमेरिकेतील बहुतांश कंपन्यांमध्ये कोरोनाची लस देण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाची लस उपलब्ध असल्यानेच कंपन्यांकडून कोरोनाची लस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे. अमेरिकेतील नागरिकांना प्रोत्साहन मिळावे म्हणूनच अशा प्रकारची प्रलोभने कंपन्यांकडून नागरिकांना देण्यात येत आहेत. अमेरिकेत नागरिकांना कोरोनाची लस घेण्याचे आवाहन करत या महामारीच्या कालावधीत सर्व स्थिती पूर्ववत व्हावी म्हणूनच नागरिकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वर्षभरासाठी दररोज फुकट डोनट

संपुर्ण वर्षभरासाठी दिवसाला एक मोफत डोनट देण्याची ऑफर क्रिस्पी क्रिमी डोनटने देऊ केली आहे. तुम्हाला कोरोना विरोधातील लसीकरणाचा पुरावा देऊनच ही डोनटची ऑफर मिळणार आहे. तर क्लेव्हलॅण्डच्या चॅगरीन सिनेमामध्ये संपुर्ण एप्रिल महिन्यात मोफत असे पॉपकॉर्न देण्यात येणार आहे. तर मार्केट गार्डन ब्रेवरीने १० टक्के बिअर्सची ऑफर देऊ केल्याचे वृत्त सीएनबीसीने दिले आहे. बिअरवर जवळपास १० टक्के इतकी सवलत पहिल्या २०२१ जणांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे. काही कंपन्यांनी एकाच महिन्यात दोन लस घेतलेल्या नागरिकांसाठी विशेष ऑफर्स देऊ केल्या आहेत.

लस घेणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर रक्कम

- Advertisement -

आपल्या बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी म्हणून बॅंगोर सेव्हींग बॅंकेने सर्व कर्मचाऱ्यांसाठी ५०० डॉलर्स इतकी रक्कम देऊ केली आहे. ही रक्कम प्रोत्साहनपर असून कोरोनाची लस घेण्याची विनंती यानिमित्ताने करण्यात आली आहे. अमेरिकेत काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत सवलत (टाईम ऑफ) देतानाच त्यासोबतच पैसेही देऊ केले आहेत. या कंपन्यांमध्ये एटी एण्ड टी, इन्स्टाकार्ट, टार्गेट, ट्रेडर जोएस, चोबानी, पेटको, दार्डेन रेस्टॉरंट, मॅकडोनाल्ड, डॉलर जनरल या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी अतिरिक्त वेळ आणि अतिरिक्त पैसे देऊ केले आहेत.

का मिळतेय ऑफर ?

अमेरिकेत आतापर्यंत एकुण लोकसंख्येच्या २८.९ टक्के म्हणजेच ९ कोटी ६० लाख जणांना कोरोनाची लशीचा किमान एक डोस तरी मिळाला आहे. तर १६.१ टक्के लोकसंख्येला म्हणजेच ५३.४ टक्के लोकसंख्येने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. जवळपास एक तृतीयांश रोजगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अमेरिकेत अजुनही लस घेतलेली नाही. म्हणूनच या लोकसंख्येला आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडून वेगवेगळी शक्कल लढवण्यात येत आहे. त्यामध्ये पैसे, प्रोत्साहनपर रक्कम कंपनीकडूनच देण्यात येत आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -