घरताज्या घडामोडीCoronavirus Vaccine: आता भारतात बूस्टर डोसची तयारी, तज्ज्ञांच्या समितीची पुढील आठवड्यात होणार बैठक!

Coronavirus Vaccine: आता भारतात बूस्टर डोसची तयारी, तज्ज्ञांच्या समितीची पुढील आठवड्यात होणार बैठक!

Subscribe

संपूर्ण युरोपियन देशांप्रमाणे भारतात कोरोना बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू आहे. याबाबत येणाऱ्या आठवड्यात विशेष तज्ज्ञांची मोठी बैठक होऊ शकते. न्यूज १८च्या बातमीनुसार, कोरोना महामारीविरोधात लोकांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी लसीचा तिसरा डोस (बूस्टर डोस) देण्याचे धोरण तयार केले जात आहे.

माहितीनुसार, हा तिसरी डोस पहिल्या टप्प्यात वृद्ध आणि इतर आजाराने संक्रमित असलेल्या व्यक्तींना देण्याच्या तयारीत आहे. तज्ज्ञांच्या मते या लोकांची रोगप्रतिकारशक्ती निरोगी व्यक्तींच्या तुलनेत कमजोर असते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अशा व्यक्तींची निवड केली जाईल. त्यानंतर निरोगी असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस दिला जाईल. दुसरा डोस घेतल्यानंतर काही आठवड्यात निरोगी व्यक्तींना बूस्टर डोस दिला जाईल.

- Advertisement -

कोविन पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरात ११५ कोटी ७९ लाख ७० हजार ३५५ लसीचे डोस दिले गेले आहेत. यापैकी पहिला डोस ७६ कोटी ३५ लाख २५ हजार ८४२ घेतला असून ३९ कोटी ४३ लाख ४४ हजार ५१३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. देशात आज दिवसभरात ११ हजार १०६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४५९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. १२ हजार ७८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या देशात १ लाख २६ हजार ६२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – Indian Corona Vaccine : भारताच्या Covaxin आणि Covishield ला ११० देशांची परवानगी, इतर देशातही मान्यतेसाठी प्रयत्न सुरु


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -