घरट्रेंडिंगcovid-19 Vaccine: या पोर्टलद्वारे जाणून घ्या, कोविड लस केंद्रासह कोरोना लसीच्या स्लॉट्सबद्दल...

covid-19 Vaccine: या पोर्टलद्वारे जाणून घ्या, कोविड लस केंद्रासह कोरोना लसीच्या स्लॉट्सबद्दल सर्वकाही…

Subscribe

गेल्या वर्षी कोरोनाबाधितांमध्ये घट झाल्यानंतर भारतात यावर्षी पुन्हा एकदा कोरोनाचे संकट वाढल्याचे दिसत आहे. कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. गेल्या चार दिवसांपासून देशात रोज कोरोनाचे साधारण चार लाखांहून अधिक बाधितांची नोंद केली जात आहे. अशा परिस्थितीत, कोरोनाची लस या महामारीवर मात करण्याचे एक उत्तम साधन आहे. दरम्यान, भारतात लोकसंख्येनुसार त्या प्रमाणात लस न मिळणे ही देखील एक मोठी समस्या आहे.

कोरोनाची लस कोठे आणि कोणत्या प्रमाणात उपलब्ध आहे, याची माहिती मिळवणं देखील नागरिकांना कठीण जात आहे. अशा परिस्थितीत काही संशोधक आणि तंत्रज्ञानाच्या काही सुसज्ज संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या भागात कोविड लस कोठे उपलब्ध आहेत, याबद्दल माहिती मिळवू शकतात. या थर्ड पार्टी पोर्टलद्वारे कोरोना लस कोठे उपलब्ध आहे, याची माहिती तुम्ही सहजपणे शोधू शकता, परंतु ही माहिती मिळवण्या़साठी तुम्हाला कोविन पोर्टललाही भेट द्यावी लागणार आहे. जाणून घ्या, अशा काही पोर्टलविषयी…

- Advertisement -

Covid-19 Vaccine Finder

पेटीएमने कोविड लसीकरण स्लॉट सर्च करण्यासाठी एक नवे टूल Paytm Vaccine Slot Finder लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या भागात कोरोना लसीच्या उपलब्धतेबद्दल माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला पेटीएम अ‍ॅप उघडावे लागणार आहे. यामध्ये, तुम्हाला मिनी अ‍ॅप स्टोअर सेक्शन दिसेल. यावर क्लिक करून व्हॅक्सीन फाइंडर या पर्यायावर क्लिक करा. येथे, १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांना पिन कोड, जिल्हा इत्यादी माहिती भरावी लागणार आहे. जर तुम्हाला लस उपलब्ध नाही असे दिसले तर ‘स्लॉट उपलब्ध असल्यास मला सूचित करा’ हा पर्याय देखील येथे दिसेल. त्यावर क्लिक करा. अशा परिस्थितीत तुम्हाला सद्यस्थितीची माहिती मिळू शकेल.

Getjab.in

हे देखील एक योग्य पोर्टल आहे, जेथे तुम्ही लस उपलब्धतेशी संबंधित सर्व माहिती सहज मिळवू शकता. आयएसबीचे माजी विद्यार्थी श्याम सुंदर आणि त्याच्या साथीदारांनी हे पोर्टल लॉन्च केले आहे. यात तुमच्याकडून लोकेशन, फोन नंबर, ईमेल, नाव इत्यादी माहितीही मागितली जाते. यासह त्यांचा असा दावा आहे की ही माहिती इतर कोणाबरोबरही शेअऱ करण्यात येत नाही.

- Advertisement -

CoWIN

कोरोना संदर्भातील माहिती उपलब्ध असणारे हे सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहे. येथे, लस उपलब्धतेबद्दल माहिती मिळण्यासह तुम्ही लससाठी स्लॉट सहज बुक करू शकता.

MyGov Corona Helpdesk

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे देखील तुम्ही कोरोना लस उपलब्ध होण्यासंदर्भातील माहिती शोधू शकता. यासाठी तुम्हाला MyGov Corona Helpdesk च्या चॅटवर जावे लागेल. मागील वर्षी मार्चमध्ये याची सुरूवात करण्यात आली होती. MyGov Corona Helpdesk वरून माहिती मिळविण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर 9013151515 हा नंबर सेव्ह करावा लागेल. यानंतर या क्रमांकावर ‘हॅलो’ पाठवल्यानंतर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -