Corona Vaccination: भारताने १५० कोटी लसीकरणाचा टप्पा केला पार

common cold t cells may offer protection against coronaviru says uk study

देशातील कोरोना विरोधातील लसीकरण मोहीमेत आज महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. देशात आतापर्यंत १५० कोटी डोस देण्यात आले आहेत. सुरुवातीला धीम्या गतीने सुरू झालेल्या देशातील लसीकरण मोहीम ऑगस्ट २०२१ पासून वेगाने सुरू झाली. सप्टेंबर महिन्यात लसीकरण मोहीमेसाठी चांगला होता. या महिन्यात तब्बल २४ कोटी डोस लोकांना देण्यात आले. १ डिसेंबरपासून दररोज ६८ लाख लोकांना लस दिली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकातमध्ये चित्तरंजन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर संस्थेच्या दुसऱ्या कॅम्पसचे उद्घाटन केले. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना संदर्भात भाष्य केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितले की, देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे १५० कोटी डोस देण्यात आले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२१ रोजी १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार करून भारताने नवा इतिहास रचला होता. यापूर्वी ७ ऑगस्ट २०२१ ला देशातील लसीकरणाचा आकडा ५० कोटी पार गेला होता. देशात आतापर्यंत ८७ कोटींहून अधिक पहिला डोस देण्यात आला आहे, तर ६२ कोटी लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. तसेच ४५ वर्षांवरील जास्त वय असलेल्या ३५ कोटी लोकांना लस घेतली आहे. तर दोन कोटी किशोरवयीन मुलांचेही लसीकरण करण्यात आले आहे.

लसीकरण मोहीमेत हे राज्य अव्वल

देशातील लसीकरण मोहीमेत उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये २० कोटींहून जास्त लोकांचे लसीकरण झाले होते. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण झाले आहेत. १३ कोटींहून अधिक महाराष्ट्रात लसीकरण झाले आहेत. त्यानंतर पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेशमध्ये जवळपास ११-११ कोटी लसीकरण झाले आहे.


हेही वाचा – Booster Dose India: भारतात कॉकटेल बूस्टर डोस शक्य नाही; कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी – ICMR प्रमुख