घरताज्या घडामोडीपुढील दोन महिन्यात स्वदेशी लसीची अंतिम चाचणी पूर्ण होणार

पुढील दोन महिन्यात स्वदेशी लसीची अंतिम चाचणी पूर्ण होणार

Subscribe

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी एका वेब कॉन्फरन्सिंग दरम्यान याबाबत सांगितले.

कोरोना व्हायरसवरील भारतीय लसीचे अंतिम चाचणी पुढच्या दोन महिन्यांत पूर्ण होणार असून ही लस खूप स्वस्त असेल. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन म्हणाले की, ‘कोरोनाची स्वदेशी लसीची चाचणी पुढील एक-दोन महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.’ एका वेब कॉन्फरन्सिंग दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी असे सांगितले.

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि भारत बायोटेकने या महिन्यात ‘कोव्हॅक्सिन’ (COVAXIN) च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये २६ हजार लोक भाग घेत आहेत. ही सर्वात प्रगत भारतीय प्रायोगिक लस असल्याचे म्हटले जात आहे. हर्ष वर्धन म्हणाले की, ‘आपण आपली स्वदेशी लस विकसित करण्याच्या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आहोत. आपण पुढील एक-दोन महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे. तसेच सरकारची योजना जुलैपर्यंत २० ते २५ कोटी भारतीयांना लसीकरण करण्याची आहे.’

- Advertisement -

माहितीनुसार, कोरोना लसीच्या स्वदेशी लसीची किंमत सुमारे १०० रुपये असून शकते. आतापर्यंत याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. तसेच असे देखील म्हटले जात आहे की, ‘मार्च-एप्रिलपर्यंत कोरोनाची स्वदेशी लस भारतात उपलब्ध होईल’.

आरोग्यमंत्री हर्ष वर्धन म्हणाले की, ‘आम्ही लसीच्या क्षेत्रात वेगाने काम करत आहोत. भारत लस तयार करण्यातील जगातील कोणत्याही देशाच्या मागे नाही आहे. पुढच्या वर्षी २०२१च्या सुरुवातील भारतात लस लोकांसाठी उपलब्ध होईल. तसेच कोरोना लस जेव्हा तयार होईल, तेव्हा सर्वात पहिल्यांदा आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि वृद्ध (६५ वयापासून अधिक लोकांना) लोकांना दिली जाईल. मग ५०-६५ वयातील लोकांनी लस दिली जाईल.’

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने लसीची किंमत केली जाहीर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -