घरताज्या घडामोडीCOVID-19 Vaccine: जगभरातील लसीकरणात भारत अव्वल स्थानावर, अमेरिका-ब्रिटनला टाकलं मागे

COVID-19 Vaccine: जगभरातील लसीकरणात भारत अव्वल स्थानावर, अमेरिका-ब्रिटनला टाकलं मागे

Subscribe

देशात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी वेगवान लसीकरण सुरू आहेत. कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लसीकरणाची (Vaccination In India) संख्या ३२ कोटी पार झाली आहे. देशात रविवारी दिवसभरात १७ लाख २१ हजार २६८ लसीचे डोस दिले गेले असून आतापर्यंत लस देण्याची एकूण संख्या ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७वर पोहोचली आहे. यामुळे भारत जगातील सर्वाधिक लसीकरण करणारा देश ठरला आहे. ग्लोबल वॅक्सीन ट्रॅकरच्या एका रिपोर्टनुसार, ब्रिटन, अमेरिका, इटली, जर्मनी, फ्रान्स आणि भारतात लसीकरणाचा वेग जास्त आहे. भारतात लसीकरणाला सुरुवात १६ जानेवारीपासून झाली होती, तर ब्रिटनमध्ये ८ डिसेंबर, अमेरिकेत १४ डिसेंबर आणि इटली, जर्मनी, फ्रान्समध्ये २७ डिसेंबरपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. असे असूनही जगभरातील लसीकरणात भारत अव्वल स्थानावर आहे.

माहितीनुसार, सोमवारी २८ जूनच्या सकाळी ८ वाजेपर्यंत ब्रिटनमध्ये ७ कोटी ६७ लाख ७४ हजार ९९०, अमेरिकेत ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८, इटलीमध्ये ४ कोटी ९६ लाख ५० हजार ७२१, जर्मनीमध्ये ७ कोटी १४ लाख ३७ हजार ५१४ आणि फ्रान्समध्ये ५ कोटी २४ लाख ५७ हजार २८८ जणांचे लसीकरण पार पडले आहे. भारतात हिच संख्या ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ इतकी आहे.

- Advertisement -

भारतात लसीकरणासाठी ऑनलाईन आणि ऑनसाईट रजिस्ट्रेशनची व्यवस्था आहे. लसीकरण करण्यासाठी नागरिकांना कोविन पोर्टल, आरोग्य सेतु आणि उमंग अॅपच्या माध्यमातून लसीकरण करू शकतात. याशिवाय लसीकरण केंद्रावर रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी कोविन प्लेटफॉर्मवर रजिस्ट्रेशन २८ एप्रिलपासून सुरू झाले होते.

भारतातील लसीकरण मोहिमेच्या १६३व्या दिवशी २७ जूनला १३.९ लाख जणांना पहिला डोस आणि ३.३ लाख जणांना दुसरा डोस देण्यात आला होता. देशात यावर्षी १ एप्रिलपासून ४५ वर्षांहून अधिक वयोगटातील सर्व लोकांच्या लसीकरणाला सुरुवात केली गेली होती. याशिवाय १ मेला १८-४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली होती.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -