घरदेश-विदेशCovid vaccination for all above 18: प्रौढांसाठी २४ एप्रिलपासून नोंदणी सुरू, Co-Win...

Covid vaccination for all above 18: प्रौढांसाठी २४ एप्रिलपासून नोंदणी सुरू, Co-Win रजिस्ट्रेशनची प्रक्रिया काय?

Subscribe

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने सुरू आहे. एकीकडे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करत आहे तर दुसरीकरी वेगाने कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यान, येत्या १ मेपासून वयवर्ष १८ असणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण केले जाणार असून त्यांची नोंदणी पुढील ४८ तासात सुरू होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आर एस शर्मा Chief Executive Officer of the National Health Authority (NHA) यांनी गुरुवारी दिली.

दरम्यान, १ मेपासून होणाऱ्या १८ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लस घेण्यासाठी CoWin या अॅप्लिकेशवर नोंदणी करणं आवश्यक असणार आहे. या नोंदणीची प्रक्रिया आगामी दोन दिवसांत म्हणजेच २४ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. आर एस शर्मा यांनी असेही सांगितले की, कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या या देशी लसींव्यतिरिक्त काही केंद्रांवर रशियन लस स्पुटनिक व्ही ही लस देखील उपलब्ध असणार आहे. तर वेगाने लसीकरण होण्यासाठी अधिक केंद्रे आणि खाजगी सुविधा देखील उभारण्यात येत आहेत.

लसीसाठी अशी करा Co-Win अॅपवर नोंदणी

  • सर्वात आधी तुम्हाला Co-Win registration अ‍ॅपवर रजिस्टर करावे लागेल.
  • त्यासाठी तुम्हाला https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जाऊन स्वतःचा मोबाईल नंबर नोंदवावा लागेल. तुम्हाला आधार क्रमांक, पॅन क्रमांक वा इतर नोंदणीकृत ओळखपत्राची नोंद करावी लागेल.
  • त्यानंतर आपल्याला वैध मोबाईल नंबर नोंदवावा लागेल. त्यानंतर गेट ओटीपी बटणावर क्लिक करा.
  • तुम्ही पोर्टलवर रजिस्टर केलेला मोबाईल नंबर वापरून लॉगिन करा. तुम्हाला या नंबरवर एक OTP येईल.
  • ओटीपी नोंदवून व्हेरिफाय बटणावर क्लिक करावे लागेल.
  • वॅक्सिनेशन सेशनसाठी रजिस्टर करा, ज्या ठिकाणी तुम्ही व ३ मेंबर्स रजिस्टर करू शकता.
  • त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यातलं शहर, वॉर्ड वा पिन कोड हे निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रांची यादी दिसू लागेल. तुम्हाला हवे असलेले लसीकरण केंद्र तुम्ही निवडू शकतात.
  • लसीकरणाची तारीख निवडा, ज्याठिकाणी आपल्याला स्लॉट दिला जाईल. एकेका केंद्रावर क्लिक करून तुम्ही तिथे कोणत्या तारखेचे स्लॉट उपलब्ध आहेत, हे तपासू शकता. त्यातला तुमच्या सोयीचा स्लॉट निवडा आणि नक्की करा.
  • ज्या केंद्रावर पैसे भरून लस घ्यावी लागणार आहे, तिथे Paid असा पर्याय तुम्हाला दिसेल.
  • या अपॉइंटमेंटच्या दिवशी लस घ्यायला जाताना तुम्ही ज्या ओळखपत्राच्या आधारे नोंद केलेली आहे, ते सोबत न्यायला विसरू नका.
  • लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कधी येऊन दुसरा डोस घ्यायचा आहे, ते सांगणारा sms तुम्हाला येईल.
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -