घरदेश-विदेशRegistration for Vaccine १८ वर्षावरील सर्वांना 'या' वेळेत मिळणार लस, दोन मिनिटात...

Registration for Vaccine १८ वर्षावरील सर्वांना ‘या’ वेळेत मिळणार लस, दोन मिनिटात करा रजिस्ट्रेशन

Subscribe

देशात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. अनेक भागात लसीकरणाचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र सरकरा अनेक लसींना आपतकालीन परिस्थितीत वापरण्यास परवानगी देत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भारतामध्ये लसीकरण मोहिमेला आणखी गती मिळणार आहे. यातच १ मे पासून देशात १८ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेता आहे. लसीकरणासाठी 28 एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार असे जाहीर केले मात्र अनेकांनी मध्यरात्रपासूनच वेबसाईटवर नाव रजिस्टर करण्याचा प्रयत्न केला मात्र जन्मवर्ष टाकताच ४५ वर्षावरील नागरिकच रजिस्ट्रेशन करु शकतात असा मेसेज येत होता. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र ऍपवर पूर्वनोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळणार आहे. यासाठी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागणार आहे. रजिस्टर करताना तुमच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्राव्हिंग लायसन किंवा मतदार ओळखपत्र असणे गरजेचे आहे. त्यावरील आयडी नंबर आणि इतर अधिकृत माहिती टाकावी लागणार आहे.

तुम्ही कोविन (CoWIN app) किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे (Arogya Setu App) कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करु शकणार आहात. तसेच www.cowin.gov.in या वेबसाईटवरूनही रजिस्ट्रेशन करु शकता. ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया बुधवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून सुरु होणार आहे. ४५ वर्षांवरील लोकांसाठी हे रजिस्ट्रेशन पूर्वीप्रमाणेच सुरु असणार आहे.

- Advertisement -

दोन मिनिटात करा रजिस्ट्रेशन प्रक्रिया…

१) प्रथम www.cowin.gov.in या अधिकृत साईटवर जा.

२) Register/ Sign in yourself  मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका.

- Advertisement -

३) यानंतर तुम्हाला OTP येईल तो तेथे टाकून क्लिक करा.

४) Vaccine Registraction form भरा.

५) schedule appointment वर क्लिक करा.

६)पिन कोड टाका. Sesstion निवडा- सकाळचे किंवा दुपारचे.

७) Vaccin center Date निवडा.

८)Appointment book करून ती conform करा.

९) Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.

रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर येणारा मेसेज जपून ठेवणे गरजेचे आहे. कारण लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर तुमचे अधिकृत ओळखपत्र आणि तो मेसेज दाखवूनच लस मिळणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -