घरCORONA UPDATEकोरोना प्रतिबंधक लस निर्मिती; मानवी चाचणी सुरु

कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती; मानवी चाचणी सुरु

Subscribe

कोरोना विषाणूवर कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती करण्यात आली असून ही मानवी चाचणी सुरु करण्यात आली आहे.

चीनच्या वुहानमधून जगभर पसरलेल्या कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या कोरोना विषाणूने संपूर्ण देशाला वेढले आहे. जगात आतापर्यंत कोविड – १९ च्या रुग्णांची संख्या वाढत असून २६ लाख ३७ हजार ६८१ लोकांना कोरोनाचीबाधा झाली आहे. तर कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १ लाख ८४ हजार २२० लोकांना मृत्यू झाला आहे. तर ७ लाख १७ हजार ७५९ लोक रुग्णालयातून बरे होऊन घरी परतले आहे. अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन हे जगातील बलाढ्य देश देखील कोरोनाशी लढा देत आहेत. तर अमेरिकेमध्ये सर्वात अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यातच एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. इंग्लंडमध्ये कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी मानवी चाचणी सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

इंग्लंडच्या प्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांची टीम कोविड – १९ विरोधात लस विकसित करण्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. ऑक्सफर्डच्या लस प्रकल्पामध्ये आदर पूनावाल यांची सिरम इन्स्टिट्यूट भागीदार आहे. विशेष म्हणजे ऑक्सफर्डच्या या लस प्रकल्पामध्ये जगातील सात संस्थांचा सहभाग देखील आहे. तसेच कोरोना विषाणूच्या जनुकीय घटकांचा अभ्यास करुन ही लस तयार करण्यात आली आहे.

स्वयंसेवकांना दिला जाणार पहिला डोस

इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये गुरुवारी या लसीचा पहिला डोस स्वयंसेवकांना दिला जाणार आहे. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये एकूण ५१० स्वयंसेवकांवर ही चाचणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे या सर्वांचे वय १८ ते ५५ या दरम्यान आहे.

- Advertisement -

मानवी चाचणी ८० टक्के यशस्वी होणार

जी मानवी चाचणी तयार करण्यात आली आहे. ही चाचणी ८० टक्के यशस्वी होण्याची शक्यता आहे. जर ही चाचणी यशस्वी झाली आणि त्यानंतर लस निर्मितीसाठी आवश्यक मंजुऱ्या वेळेत मिळाल्या तर येत्या सप्टेंबरपर्यंत या लसीचे लाखो डोस निर्माण करण्याचे ध्येय आहे. – सरा गिलबर्ट; जेनर इन्स्टिट्यूट


हेही वाचा – Corona: महाराष्ट्राला प्लाझ्मा थेरेपीची परवानगी मिळाली!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -