घरCORONA UPDATECOVID-19 Vaccine:देशात कोरोना लसीकरणामुळे वाचले हजारोंचे जीव, संशोधनातून माहिती झाली उघड

COVID-19 Vaccine:देशात कोरोना लसीकरणामुळे वाचले हजारोंचे जीव, संशोधनातून माहिती झाली उघड

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हे सुरक्षित आणि प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे लसीकरण मोहिम अधिक वेगाने कशी सुरु ठेवता येईल यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान देशातील आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांवर केलेल्या अभ्यासात, कोरोना संसर्ग झाल्यानंतर रुग्णाच्या एकूण प्रकृतीविषयी बरीच माहिती समोर आली आहे. यात कोरोना लसीकरणानंतर देशात आत्तापर्यंत हजारोंचे प्राण वाचवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आल्याची या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका हा आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आहे. कारण रुग्णालयात, किंवा आरोग्य क्षेत्राच्या ठिकाणी काम करताना कोरोनाचा थेट संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत कोरोना लसीकरण झालेल्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्गाचा धोका कमी असल्याची दिलासाजनक बाब संशोधनातून समोर आली आहे.

- Advertisement -

यावर नीति आयोगाचे सदस्य डॉ. वी.के.पॉल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत सांगितले की, एका अभ्यासातून असे दिसून आले की, देशात कोरोनाविरोधी लस घेणाऱ्या नागरिकांना कोरोना संसर्ग झाल्यास ७५ ते ८० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही. याव्यतिरिक्त ८ टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची आवश्यकता असते. तर केवळ ६ टक्के रुग्णांनाच आयसीयूमध्ये भरती करावे लागते.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, “गेल्या २४ तासांत देशात ६२ हजार ४८० नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. परंतु गेल्या ११ दिवसांपासून एक लाखाहूनही कमी कोरोना रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णांची संख्या ७ लाख ९८ हजार ६५६ वर आली आहे. गेल्या ३ दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख १४ हजारांनी घटली आहे. तर रिकव्हरी रेट वाढून ९६ टक्के झाला आहे. दररोज देशात १८ लाख ४ हजार कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

देशात लसीकरणाचा वेग कसा वाढतोय?

गुरुवारी आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाविरोधी लसींचे २६. ८६ कोटी डोस देण्यात आले आहेत. ज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांना देण्यात आलेल्या ५ कोटी डोसचा समावेश आहे.

मंत्रालयाने सांगितले की, गुरुवारी १८ ते ४४ वयोगटातील १८ लाख ९४ हजार ८०३ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर ८८ हजार १७ हजार जणांना दुसरा डोस दिला आहे. देशभरात लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू झाल्यापासून वरील वयोगटातील एकूण ४ कोटी ९३ लाख ५६ हजार २७६ लोकांना पहिला डोस देण्यात आला असून १० लाख ५८ हजार ५१४ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

बिहार, दिल्ली, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी १८ ते ४४ वयोगटातील १० लाख नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे.


Online Fraud पासून वाचण्यासाठी फॉलो करा SBI च्या ‘या’ खास टिप्स


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -