घरताज्या घडामोडीCovid-19 विषाणूचा परिणाम Sperm count वरही, Erectile dysfunction चाही तीनपट धोका

Covid-19 विषाणूचा परिणाम Sperm count वरही, Erectile dysfunction चाही तीनपट धोका

Subscribe

ज्या पुरूषांना covid-19 विषाणूची लागण होते, अशा पुरूषांमध्ये erectile dysfunction ची म्हणजे पुरूषांच्या लैंगिक आयुष्याशी संबंधित अशी समस्या उद्भवण्याची शक्यता एका नव्या संशोधन अभ्यासातून वर्तवण्यात आली आहे. रोमच्या विद्यापिठात संशोधनाचा भाग म्हणून डॉक्टरांनी १०० जणांना लैंगिक आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारले. त्यामध्ये सरासरी ३३ वयोगट असलेल्या पुरूषांचा समावेश होता. ज्या पुरूषांना लैगिंक आयुष्यात समस्या आहेत, अशाच पुरूषांची निवड या संशोधनासाठी करण्यात आली होती. संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या पुरूषांमध्ये ९ टक्के पुरूष असे होते, ज्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती, पण त्यांना लैंगिक समस्यांना सामोरे जावे लागत होते. पण त्यापैकी २८ टक्के पुरूष असे होते, ज्यांना कोरोनाची लागण होऊन गेली होती. अॅंड्रॉलॉजी या जर्नलच्या माध्यमातून हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर लंडनच्या अभ्यासानुसार पुरूषांच्या स्पर्म काऊंटवरही कोरोनाच्या विषाणूचा परिणाम होत असल्याचा अभ्यास समोर आला आहे.

संशोधनातील माहितीनुसार कोरोनाचा विषाणू संपुर्ण शरीरातील रक्त वाहिन्यांमध्ये परिणाम करतो. पुरूषांच्या लिंगाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या या अतिशय छोट्या आणि आखूड असतात. त्यामुळेच रक्तपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्याचाच परिणाम हा पुरूषांच्या लैंगिक आयुष्यावरही दिसून येतो. महिलांच्या तुलनेत पुरूषांना लैंगिक समस्येला सामोरे जावे लागत आहे ही समस्या नुकत्याच समोर आलेल्या काही संशोधनामधून समोर येत आहे. पुरूष हे महिल्यांच्या तुलनेत कोरोनाच्या विषाणूला अधिक सहजपणे बळी पडतात आणि पुरूषांमध्ये महिल्यांच्या तुलनेत मृत्यूचा दर हा १.७ टक्के असतो असेही संशोधनातून समोर आले आहे. पुरूषांमधील सेक्स हार्मोन्समध्ये ऑस्ट्रेजेन आणि टेस्टोजेनची पातळी कमी जास्त झाल्यानेही याचा परिणाम हा पुरूषांच्या लैंगिक आयुष्यावर दिसून येत आहे. परिणामी पुरूषांना प्रजनन क्षमतेदरम्यान महत्वाच्या अशा erectile dysfunction च्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या विषाणूमुळे तीन पटीने या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे पुरूषांनी मांडलेल्या प्रतिसादामधून समोर आले आहे.

- Advertisement -

इंग्लंडमध्ये झालेल्या संशोधनानुसार पुरूषांच्या तुनलेत महिलांना कोरोना नसतानाच्या काळातही अधिक आयुष्यमान आहे. त्यासाठी मुख्यत्वेकरून महिलांची इम्युनिटी आणि ऑस्ट्रेजेन या गोष्टी कारणीभूत आहे. याच गोष्टींचा फायदा हा ह्दय सुदृढ ठेवण्यासाठी होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. पण पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन सिस्टिम ही कार्डिओवस्क्युलर सिस्टिमवर कोरोना व्हायरचा प्रभाव मोठा असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. कार्डिओवस्क्युलर सिस्टिम ही आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी महत्वाची अशी शरीरातील रचना आहे. कोरोनाच्या विषाणुमुळे या संपुर्ण यंत्रणेवर मोठा ताण येत असल्याचे समोर आले आहे.

पुरूषांच्या Sperm count वर होतोय परिणाम

इंग्लंडमध्ये झालेल्या संशोधनानुसार सेक्स हार्मोन्सच्या निर्मितीवरच कोरोना व्हायरस हावी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना व्हायरसचा शरीरात शिरकाव झाल्यानंतर केवळ फुफ्फुसांनाच तो हानी पोहचवत नाही तर पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे, लंडनच्या हॅमरस्मिथ हॉस्पिटलच्या रिप्रॉक्टिव्ह एन्डोक्रिनोलॉजी आणि एन्ड्रॉलॉजी विभागाच्या सल्लागार डॉ छन्ना जयसेना यांनी ही माहिती डेलिमेल युकेसाठी ही माहिती दिली आहे. कोरोनाचा शिरकाव शरीरात झाल्यानंतर फक्त फुफ्फुसापुरता तो मर्यादित न राहता शरीराच्या अनेक भागांवर त्याचा परिणाम होतो. परिणामी पुरूषांमध्ये टेस्टोरॉनचे प्रमाण कमी होणे, महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम होणे आणि मेनोपॉजसारखी समस्या ही महिलांच्या बाबतीत आढळून आली आहे. एकुणच आरोग्यावर आणि प्रजनन क्षमतेवरही याचा परिणाम आढळून आला आहे.

- Advertisement -

कोरोना व्हायरस हा सेक्स हार्मोन्सचे प्रमाण कमी करण्यासाठी इतर कोणत्याही इन्फेक्शनच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरला आहे, असा कोणताही सबळ पुरावा अजुनही आढळलेला नाही. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्याने जर सेक्स हार्मोन्सचे प्रमाण कमी होत असेल तर ही गोष्ट तात्पुरत्या कालावधीसाठीची असू शकेल असे मत डॉ जयसेना यांनी व्यक्त केले आहे. जेव्हा कोणताही फ्लू होतो तेव्हा संपुर्ण शरीर पूर्ववत असे काम करण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागतो. फ्लू च्या कालावधीत पुरूषांचा स्पर्म काऊंट हा शून्यावर जातो. त्यानंतर किमान तीन महिने हा स्पर्म काऊंट पूर्ववत होण्यासाठीचा कालावधी लागतो. त्यामुळे कोरोनामुळेही शरीरातील प्रजनन क्षमतेवर झालेला परिणाम पाहता त्याच्या रिकव्हरीसाठीही अधिक कालावधी लागू शकतो असे डॉ जयसेना यांचे म्हणणे आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -