घरट्रेंडिंगCovid-19: कोरोनातून सुटका होणे नाहीच, विळखा कायम राहणार- शास्त्रज्ञ

Covid-19: कोरोनातून सुटका होणे नाहीच, विळखा कायम राहणार- शास्त्रज्ञ

Subscribe

संपूर्ण जगात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असताना अशा परिस्थितीत एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. या जीवघेण्या व्हायरसवर बारकाईने अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, कोरोना व्हायरस या जगातून कधीही जाणं शक्य नसल्याने, कोरोनातून अद्याप सुटका होणे नाहीच. हा व्हायरस सजीव प्राण्यांच्या संपर्कात येऊन त्याची उपस्थिती कायम ठेवण्याची शक्यता आहे. या व्हायरसविरूद्ध जेवढं माणसाचं शरीर लढू शकेल तेवढाच हा व्हायरस कमकुवत होईल. परंतु व्हायरसचा कमकुवतपणा त्याचे अस्तित्व देखील नाहिसे करणार नाही. त्यामुळे कोरोनाचा विळखा कायम राहणार असल्याचा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे. याबरोबरच जगात असणाऱ्या इतर व्हायरसप्रमाणे आता कोरोना व्हायरसचे अस्तित्व कायमचे राहणार असल्याचेही म्हटले आहे.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे ज्येष्ठ वैज्ञानिक आणि कोरोना व्हायरसवर सुरूवातीपासून संशोधक करणारे समीरन पांडा यांनी यासंदर्भात असे सांगितले की, पूर्वीपासूनच कोविड -१९ व्हायरस हा अस्तित्त्वात होता आणि भविष्यातही राहील. डॉ. समीरन पांडा हे चीनमधील वुहानमध्ये पहिल्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यापासून या प्राणघातक व्हायरसच्या प्रत्येक घटकावर बारीक लक्ष ठेवून आहेत. कोणताही व्हायरस जिवंत प्राण्यांच्या संपर्कात आला असेल तो व्हायरस आपले अस्तित्व सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले. कारण व्हायरस वाढविण्यासाठी प्राण्यांच्या पेशी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. म्हणूनच, आता कोरोना व्हायरसचा नष्ट होण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा व्हायरस आपल्या आजूबाजूला कायम राहील, असाही इशारा त्यांनी दिला.

- Advertisement -

प्राणघातक व्हायरसच्या अस्तित्वानंतरही याची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती या व्हायरसविरूद्ध जितकी अधिक मजबूत होईल तितका हा व्हायरस कमकुवत होईल. ज्या लोकांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत नसते, त्यांच्यावरील व्हायरसचा हल्ला प्राणघातक ठरू शकतो, म्हणून या व्हायरसविरूद्ध आपले शरीर आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करावी लागेल, त्यामुळे याची भीती बाळगणे योग्य नाही, असे डॉक्टर समीरन पांडा यांनी सांगितले.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -