घरदेश-विदेशदिलासा! कोरोनाचा धोका कमी करणार Covid Antiviral गोळी!

दिलासा! कोरोनाचा धोका कमी करणार Covid Antiviral गोळी!

Subscribe

गेल्या एक ते दीड वर्षांपासून जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. कोरोना लस घेतल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा आणि मृत्यू होण्याचा धोका कमी होतो, त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन सरकारकडून वारंवार केले जात आहे. त्यातच आता कोरोना विरोधी गोळी तयार करण्यात देखील शास्त्रज्ञ यशस्वी झाले आहे. कोरोना विरोधी गोळीच्या क्लिनीकल ट्रायलमध्ये चांगले परिणाम पाहायला मिळाले आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते, तसेच त्यांचा मृत्यूचा धोका ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी अँटीव्हायरल गोळी प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

द हिल ने दिलेल्या माहितीनुसार, या गोळाच्या चाचणीच्या निकालांच्या आधारे क्लिनिकल ट्रायलनंतर लवकरात लवकर हे औषध बाजारात उपलब्ध होणार आहे. युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनकडे आपत्कालीन वापरासाठी अर्ज सादर करणार असल्याचे देखील Merck आणि Ridgeback Biotherapeutics या अमेरिकन कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

अमेरिकेच्या Merck आणि Ridgeback Biotherapeutics या कंपन्यांनी तयार केलेल्या कोरोना विरोधी औषधाचे कोविड-19 अति संसर्गजन्य समजल्या जाणाऱ्या डेल्टा विषाणूवर देखील चांगले परिणाम दिसून आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, Covid Antiviral Pill कोरोना संसर्गाचा धोका आणि कोरोनाच्या मृत्यूची शक्यता कमी करणार असल्याचा दावा अमेरिकन कंपनीकडून करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत ९० कोटी २६ लाख ७५ हजार १७८ कोरोना प्रतिबंधक डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत ६५ कोटी ७८ लाख ३५ हजार ६८३ जणांना लसीचा पहिला डोस तर २४ कोटी ४८ लाख ३९ हजार ४९५ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये देशातील सर्वाधिक लसीकरण झाले. लसीकरणात दुसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्र आहे.


देशातील लसीकरणाचा आकडा 90 कोटी पार

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -