घरताज्या घडामोडीOmicron Variant: जगात पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाच्या मृत्यूची ब्रिटनमध्ये नोंद

Omicron Variant: जगात पहिल्या ओमिक्रॉन रुग्णाच्या मृत्यूची ब्रिटनमध्ये नोंद

Subscribe

जगभरात सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची दहशत पसरली आहे. ओमिक्रॉनचा वेग सातत्याने वाढताना दिसत आहे. ओमिक्रॉनची दहशत पसरल्यापासून आपण हा नवा व्हेरिएंटचा संसर्ग वेगाने वाढत असून हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कमी घातक असल्याचे सातत्याने तज्ज्ञ सांगत आहे. मात्र आता जगात ओमिक्रॉनमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या रुग्णांची नोंद झाली आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे. त्यामुळे आता जगाची आणखीन चिंता वाढली आहे.

- Advertisement -

 

पॅडिंग्टन पश्चिम लंडन येथील एका लसी केंद्रातील कार्यक्रमात बूस्टर डोस मोहिमेला गती देण्यासंदर्भात बोलताना बोरिस जॉन्सन म्हणाले की, ‘दुःखाची बाब म्हणजे ओमिक्रॉनमुळे एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ओमिक्रॉनबाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागत आहे. जर आपण हा व्हेरिएंट सौम्य आहे, जास्त घातक नाही, असा विचार करत असू तर मला वाटते हा विचार सध्या आपल्याला बदलावा लागले. वेगाने संसर्ग पसरवणाऱ्या या व्हेरिएंटचा वेग ओळखला पाहिजे. कारण हा खूप वेगाने लोकांमध्ये पसरत आहे. यासाठी सर्वांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट बूस्टर डोस आहे. दरम्यान ओमिक्रॉनविरोधात एक महत्त्वाकांशी बूस्टर डोस देण्याच्या मोहिमेला सुरुवात केली.’

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार ९ डिसेंबरपर्यंत ६३ देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार झाला आहे. भारतामध्ये ओमिक्रॉनचे ३८ रुग्ण आढळले आहेत. ५ राज्यांमध्ये रविवारी ५ नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. केरळच्या कोचीमध्ये ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. केरळच्या आरोग्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, हा संक्रमित व्यक्ती ६ डिसेंबरला ब्रिटनहून कोचीत परतला होता. ८ डिसेंबरला त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याची पत्नी आणि आईसुद्धा कोरोनाबाधित आढळली. सर्वांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले आहे.


हेही वाचा – Omicron Variant Symptoms: फक्त रात्री दिसतात ओमिक्रॉनची नवी लक्षणे, डॉक्टरांचा इशारा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -