घरCORONA UPDATEकोरोनामुळे मृत्यू, नातेवाईकांनी पेटवली रूग्णवाहिका!

कोरोनामुळे मृत्यू, नातेवाईकांनी पेटवली रूग्णवाहिका!

Subscribe

बेळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी रूग्णवाहिकेला आग लावून ती पेटवून दिली आहे. त्याचबरोबर या नातेवाईकांनी आयसीयूमधील डॉक्टरांशी गैरवर्तन करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत

बेळगावमधील बीआयएमएस रूग्णालयाबाहेर हा सगळा प्रकार घडला. रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी कोरोना वॉर्डसमोर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला आग लावली आणि पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली. या वेळी काही जणांनी आयसीयूमध्ये जाऊन डॉक्टरांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.

- Advertisement -

कर्नाटकमध्ये बुधवारी सर्वात जास्त रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी कर्नाटकात ४७६४ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर ५५ जणांचा मृत्यू झाला. आता कर्नाटकमधील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ७५ हजार ८३३ वर पोहचली आहे. तर १५१९ जणांचा मृत्यू झाला आहे.


हे ही वाचा – काढ्याची क्रेझ, चहाची टपरी बंद करुन सुरू केलं काढा सेंटर!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -