घरCORONA UPDATECovid second wave: कोरोनामुळे बिहारमध्ये सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू; महाराष्ट्रात १४ डॉक्टर मृत्यूमुखी

Covid second wave: कोरोनामुळे बिहारमध्ये सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू; महाराष्ट्रात १४ डॉक्टर मृत्यूमुखी

Subscribe

कोरोना संकटाच्या सुरुवातीपासून डॉक्टर दिवस रात्र रुग्णांच्या देखरेखीसाठी काम करत आहेत. पण या जीवणघेण्या कोरोना व्हायरसचे शिकार डॉक्टर देखील झाले आहेत. देशभरात आतापर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३२९ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)ने आज (गुरुवार) केला आहे. आयएमएच्या माहितीनुसार, बिहारमध्ये सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला असून त्यांना दिल्लीचा दुसरा नंबर आहे. तसेच महाराष्ट्रात १४ डॉक्टर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. दरम्यान आयएमएच्या या दाव्याचा आरोग्य विभागाकडून कोणताही दुजोरा मिळाला नाही आहे.

आयएमएचे अध्यक्ष डॉ. जे.ए. जयलाल म्हणाले की, ‘हा आकडा असोसिएशनच्या शाखेद्वारे मिळालेल्या माहितीनुसार जारी केला गेला आहे.’ यापूर्वी १८ मेला आयएमएने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरातील २६९ डॉक्टरांचा जीव गेल्याचे सांगितले होते.

- Advertisement -

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत सातत्याने रुग्णसंख्येत घट होत आहे. गेल्या आठवड्यात संक्रमण दर सुमारे सात टक्के कमी झाला असून आता संक्रमण दर ५.५० टक्के झाला आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत ३ हजार ९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २५२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ७ हजार २८८ जण बरे होऊन घरी गेले आहे. दिल्लीतील आता कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख १२ हजार ९५९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २२ हजार ८३१ जणांचा मृत्यू झाला असून १३ लाख ५४ हजार ४४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीत एकूण ७३ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

‘या’ राज्यांमध्ये डॉक्टरांचा कोरोनामुळे अधिक मृत्यू

राज्य            मृत्यूची संख्या
बिहार                ८०
दिल्ली               ७३
उत्तर प्रदेश          ४१
आंध्र प्रदेश           २२
पश्चिम बंगाल       १५
महाराष्ट्र              १४
ओडिसा             १४

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -