कोरोना संसर्ग वाढत असलेल्या राज्यांत चाचण्यांचा वेग वाढवा, केंद्राचे राज्यांना निर्देश

अलीकडेच जे लोक कोरोना बाधितांच्या संपर्कात आले आहेत, त्यांना उच्च धोका नसल्यास चाचणीची आवश्यकता नाही. असा सल्ला सरकारकडूनही देण्यात आला होता. 

India Coronavirus Update today 1270 new covid cases 31 death in last 24 hour
India Coronavirus Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या 10.0 टक्क्यांनी घटली, 1270 नवे रुग्ण, 31 मृत्यू

कोरोनाची चाचणी होत नसलेल्या राज्यांबद्दल केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये धोरणात्मक पद्धतीने कोरोना चाचण्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

या पत्रात केंद्राने लिहिले आहे की, विशिष्ट भागात कोरोनाचा वाढता पॉझिटिव्ही रेट पाहता धोरणात्मक आणि टप्प्याटप्प्याने कोरोना चाचणी वाढवावी. यावर अतिरिक्त आरोग्य सचिव आरती आहुजा यांनी सांगितले की, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आकडेवारीवरून असे दिसून आले की, काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना चाचणीत घट झाली आहे. या काळात कोरोना आणि ओमिक्रॉन विषाणूची प्रकरणे वाढली आहेत. यात जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनला चिंता वाढवणारा कोरोनाचा व्हेरिएंट घोषित केला आहे.

ते म्हणाले की, ओमिक्रॉन व्हेरिएंट सध्या देशभरात पसरत आहे. मंत्रालयाच्या पूर्वीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आणि 27 डिसेंबर 2021 रोजी ओमिक्रॉनच्या संदर्भात महामारी व्यवस्थापन योजना तयार करण्याबाबत गृह मंत्रालयाच्या सल्ल्याचा संदर्भ देत, आहुजा म्हणाले की, चाचणी करणे हा एक महत्त्वाचा घटक आहे. तर आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, कोरोनाचे संशयित रुग्णांचा शोध घेत त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. यामुळे कोरोना महामारीला या रुग्णांमुळे गंभीर स्तरावर पोहचवण्यासाठी रोखले जाऊ शकते.

ते म्हणाले की, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक आणि सल्ल्यासह वाचणे आवश्यक आहे, ज्यात असुरक्षित आणि दाट लोकवस्तीच्या भागात राहणाऱ्या लोकांची धोरणात्मक आणि केंद्रित तपासणी केली जावी अशी शिफारस केली आहे.

विशेष म्हणजे दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. अनेक ठिकाणी कोरोनाची चाचणी कमी असल्याने केसेस कमी येत असल्याचेही बोलले जात आहे. अलीकडेच जे लोक कोरोना बाधितांच्या संपर्कात आले आहेत, त्यांना उच्च धोका नसल्यास चाचणीची आवश्यकता नाही. असा सल्ला सरकारकडूनही देण्यात आला होता.


‘त्या’ गुंडाची फोटोसहित माहिती प्रसिद्ध करा; माधव भांडारींचे पटोलेंना आव्हान