Corona Vaccination: आता 12 वर्षांवरील मुलांचे 16 मार्चपासून लसीकरण होणार अन् 60 वर्षांवरील वृद्धांना बूस्टर डोस मिळणार

Covid Vaccination For 12-14 Year Age Group, Precaution Dose For 60+ From Wednesday
Corona Vaccination: आता 12 वर्षांवरील मुलांचे 16 मार्चपासून लसीकरण होणार अन् 60 वर्षांवरील वृद्धांना बूस्टर डोस मिळणार

देशात सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. आज देशात २ हजार ५०३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि २७ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशातील लसीकरण १ अब्ज ७९ कोटी ९१ लाख ५७ हजार ४८६ झाले आहे. अनेक तज्ज्ञांनी देशातील कोरोना नियंत्रित आल्यामागचे कारण वेगाने लसीकरण सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांचे लसीकरण केव्हा सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे. यादरम्यान सरकारने लसीकरणसंदर्भात दोन मोठे निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांचे १६ मार्चपासून लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. तसेच ६० वर्षांवरील वृद्ध बूस्टर डोसही घेऊ शकणार आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया ट्वीट करून म्हणाले की, ‘मुले सुरक्षित तर देश सुरक्षित. मला सांगताना खूप आनंद होत आहे की, १६ मार्चपासून १२ ते १३ आणि १३ ते १४ वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात होत आहे. शिवाय ६० वर्षांवरील सर्व लोकं आता बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यामुळे माझे मुलांच्या पालकांना आणि ६० वर्षांवरील लोकांना लसीकरण करण्याची विनंती आहे.’

दरम्यान १२ ते १४ वर्षांच्या वयोगटातील मुलांना Corbevax को Biological E Limited कंपनीने विकसित केलेली Corbevax कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. तसेच सध्या आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील कोणताही आजार असलेल्या कोरोनाचा बूस्टर डोस दिला जात आहे. मात्र १६ मार्चपासून ६० वर्षांवरील लोकांनाही बूस्टर डोस दिला जाणार आहे.


हेही वाचा – Corona virus: कोरोना महामारीचा लवकरच अंत होण्याची घोषणा? आता WHOचे तज्ज्ञ म्हणतात…