Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Covid vaccine : कोरोनाविरोधी लस घेण्यापूर्वी 'हे' दोन पदार्थ खाऊ नयेत, तज्ज्ञांचा...

Covid vaccine : कोरोनाविरोधी लस घेण्यापूर्वी ‘हे’ दोन पदार्थ खाऊ नयेत, तज्ज्ञांचा सल्ला

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना संसर्ग वेगाने पसरत असून रुग्णसंख्या लाखोंचा घरात पोहचली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य तज्ज्ञांकडून प्रिजव्ह केले पॅकबंद फूड खाण्यापेक्षा घराचा घरी तयार केलेले पौष्टीक, सकस आहार खाण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण प्रिजव्ह केले पॅकबंद फूडमुळे गंभीर आजार होण्याचा धोका अधिक असतो तसेच त्यात वापरण्यात आलेल्या केमिलकमुळे शरीरास कोणतेच पोषक घट मिळत नाहीत. दरम्यान एका नव्या अभ्यासानुसार, लसी घेण्यापूर्वी प्रिजव्ह केले पॅकबंद फूड खाल्ल्यास लसीकरणानंतर फायदे होण्यापेक्षा तोटा अधिक होत असल्याचे समोर आले आहे. या अभ्यासात लस घेण्यासाठी जाण्याआधी कोणते पदार्थ खाऊ नये याची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेतील एनवायरमेंटल वर्किंग ग्रुप (EWG)ने हा अभ्यास केला आहे. दरम्यान हे अभ्यासातून समोर आलेला निष्कर्ष इंटरनॅशनल जर्नल ऑफ एनवायरमेंटल रिसर्च एंड पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये छापून आला होता.

या अभ्यासानुसार, प्रिजव्ह केले पॅकबंद फूड्समध्ये वापरण्यात आलेले दोन केमिकल असलेले पदार्थ आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर गंभीर परिणाम करतात. हे केमिकल सर्वाधिक आवडत्या १.२५० पेक्षा अधिक पदार्थांमध्ये वापरले जात आहे. यातील पहिल्या केमिलकचे नाव tert-butylhydroquinone (TBHQ) आणि दुसऱ्या केमिकलचे नाव per- and polyfluoroalkyl substances (PFAS) असे आहे.

TBHQ केमिकल

- Advertisement -

TBHQ नावाचा या केमिकलचा उपयोग पॅकेटमधील अन्नपदार्थ अधिक वेळ ताजे ठेवण्यासाठी केला जातो. दरम्यान या अभ्यासात असे आढळले की, TBHQ हे प्रिजव्हेटिव्ह केमिकल शरीरातील टी, बी पेशींसह अनेक पेशींवर गंभीर परिणाम करतो. यामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ शकते.

PFAS केमिकल

PFAS या केमिकलचा उपयोग अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी केला जातो. परंतु हे केमिकल कालांतराने पॅकेटमधील पदार्थांमध्येही उतरते आणि ते पदार्थ आपण खाल्लास आपल्या इम्यनिटी सिस्टमवर परिणाम होतो. या अभ्यासानुसार हे दोन्ही केमिकल पॅकबंद फूड टिकवून ठेवण्यासाठी वापरले जात असे तरी यामुळे कॅन्सर, बाळाचे वजन कमी होणे, कॉलेस्ट्रॉल वाढणे आणि लठ्ठपणासारख्या अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अमेरिकेच्या फूड अॅण्ड ड्रग्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशन नागरिकांना केमिकल असलेले पॅकबंद अन्नपदार्थ ब्रेकफास्ट न खाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तुम्हीही पॅकबंद फूटपासून दूर राहिले पाहिजे.

लसीचा प्रभाव होतोय कमी

- Advertisement -

दुसर्‍या अभ्यासात असे आढळले की, TBHQ केमिकल असलेल्या पदार्थांमुळे फ्लूवरील लसीचा शरीरावरील परिणाम कमी होत आहे. याच कारणामुळे आरोग्य तज्ज्ञांनी केमिकल मिश्रित पदार्थ्यांचा सेवनामुळे कोरोना लस शरीरावर परिणामकारक ठरत नसल्य़ाचा दावा करत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पॅकबंद प्रिजव्हेटिव्ह पदार्थ खाण्यापेक्षा नैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळ, भाजा आणि पदार्थ खावे असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.


 

- Advertisement -