नवी दिल्ली : काही वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसच्या थैमानात अनेकांनी आपला जीव गमावला होता. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकारने कोविड लस घेणे सक्तीचे केले. त्यावेळी यासंदर्भात अनेक समज आणि गैरसमज होते, सद्याच्या घडीलाही यावरून अनेक गैरसमज आहेत. समाज माध्यमांमध्ये सध्या कोविडच्या लस घेतल्यामुळे तरुणांच्या जीवाला धोका आहे, यामुळेच मोठ्या प्रमाणात तरुणांचा मृत्यू होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोविड लसींसंदर्भात मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला असून यावर केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Covid Vaccine didn’t increase sudden death risk among young adults)
हेही वाचा : Atul Subhash Suicide : अतुल सुभाषचे वकील म्हणतात, आदेश चुकीचा असला तरी…
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा म्हणाले की, “कोविडच्या लशीमुळे तरुणांच्या जीवाला धोका नाही. जनजागृतीसाठी सरकार सोशल मीडियाचा वापर करत आहे,” अशी माहिती मंगळवारी (10 डिसेंबर) राज्यसभेत दिली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) केलेल्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, कोविड लसीमुळे भारतातील तरुणांमध्ये अचानक मृत्यूचा धोका वाढला नाही, तर याउलट त्याची भीती कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, “कोरोनामुळे साथीच्या आजारामुळे, आधीच्या हॉस्पिटलायझेशनमुळे अचानक मृत्यूचा कौटुंबिक इतिहास आणि काही जीवनशैलीमुळे मृत्यूचा धोका वाढतो.” पुढे जे. पी. नड्डा म्हणाले की, “भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने गेल्या वर्षी मे-ऑगस्ट दरम्यान 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 47 रुग्णालयांमध्ये अभ्यास केला होता. त्यांनी सांगितले की, या विश्लेषणात एकूण 729 आकस्मिक मृत्यूची प्रकरणे आणि 2916 समाविष्ट आहेत. असे आढळून आले की, कोरोना लसीचा कोणताही डोस घेतल्याने अस्पष्ट अचानक मृत्यूचा धोका कमी होतो. कोविड-19 लसीचे दोन डोस घेतल्याने अशा मृत्यूचा धोक्याची शंका कमी झाली आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, ICMR च्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीने 18 ते 45 वयोगटामधील अशा लोकांवर अभ्यास केला जे निरोगी होते, ज्यांना कुठलाही आजार नव्हता. 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2023 या काळात अचानक मृत्यूचे प्रमाण वाढले होते. त्यामागील कारण समोर आले नव्हते. हा संशोधनात 19 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 47 रुग्णालयात करण्यात आला. यावेळी 729 नमुने घेण्यात आले ज्यामध्ये अचानक मृत्यू झाला होता. 2916 नमुने असे होते ज्यांना हृदयविकाराच्या झटक्यानंतरही वाचवण्यात आले होते. या संशोधनात समोर आले की, कोविड 19 लसीची कमीत कमी 1 किंवा 2 डोस घेतल्याने विना कोणत्या कारणाशिवाय अचानक मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे. संशोधनात अचानक मृत्यूचा धोका वाढवणारे अनेक घटकदेखील समोर आले आहेत. यामध्ये मृत व्यक्तीचे रुग्णालयात दाखल करणे, कुटुंबातील एखाद्याचा अचानक मृत्यू, मृत्यूच्या 48 तास आधी अधिक मद्यपान करणे, अंमली पदार्थांचे वापर आणि मृत्यूआधी 48 तासांत जास्त शारीरिक हालचाली यांचा समावेश आहे. ICMR च्या अहवालानुसार, कोरोना लसीकरण आणि तरुण प्रौढांचा अचानक मृत्यू यांचा काहीही संबंध नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले. लसीकरणाच्या दुष्परिणामांचा ट्रॅक ठेवण्यासाठी ‘ॲडव्हर्स इव्हेंट्स फॉलोइंग इम्युनायझेशन’ (AEFI) नावाची मजबूत देखरेख प्रणाली तयार करण्यात आली असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.