लहान मुलांच्या लसीकरणाबाबत खुशखबर! SIIच्या Covovax लसीच्या ट्रायलला मान्यता?

full immunization status for children below 18 years
कोरोना निर्बंधातून लहान मुलांची सुटका, १८ वर्षाखालील मुलांना पूर्ण लसीकरणाचा दर्जा

देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फैलाव होण्याचा इशारा दिला आहे. यादरम्यानच लहान मुलांच्या लसीकरणाबाबत चांगली बातमी समोर आली आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटी (Subject Expert Committee (SEC))ने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India (SII)) कंपनीची लस कोवोवॅक्स (Covovax)च्या मुलांवरील ट्रायलला मान्यता देण्याची शिफारास केली आहे. कमेटीने काही अटींसोबत २ ते १७ वर्षांवरील मुलांवर कोवोवॅक्सच्या ट्रायलला मान्यता देण्यासाठी शिफारस केली आहे.

जर ट्रायलसाठी मान्यता मिळाली तर सीरम इन्स्टिट्यूट देशभरातील १० ठिकाणी ९२० मुलांवर कोवोवॅक्स लसीची चाचणी करेल. यामध्ये २ ते १७ वयोगटातील मुलांचा समावेश असेल, ज्यांना वेगवेगळ्या गटात विभागले जाईल. पहिला गट २ ते ११ वयोगटातील मुलांचा असेल तर दुसऱ्या गटात १२ ते १७ वयोगटातील मुलं असतील. प्रत्येक गटात ४६०-४६० मुलं असणार आहेत.

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन (Central Drugs Standard Control Organization (CDSCO))च्या कोरोना संबंधित तयार करण्यात आलेल्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटीकडून मंगळवारी २ ते १७ वयोगटातील मुलांवर कोवोवॅक्स लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी सीरम इन्स्टिट्यूला मान्यता देण्यासाठी शिफारस करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूटने कोवोवॅक्स लसीच्या मुलांवरील चाचणीसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) मान्यता देण्याची मागणी केली होती. पण सरकारी तज्ज्ञांच्या समितीकडून कोवोवॅक्स लसीच्या मुलांवरील चाचणीसाठीची परवानगी नाकारण्यात आली. कारण कोवोवॅक्स लसीला इतर कोणत्याही देशात लहान मुलांसाठी मंजूरी दिली नाही आहे. तसेच प्रौढांच्या चाचण्यांमध्ये लसीची सुरक्षा आणि कार्यक्षमतेशी संबंधित डेटा देण्यास तज्ज्ञांच्या समितीने सांगितले होते. या डेटाचा आढावा घेतल्यानंतर कंपनीने मुलांवर या लसीची चाचणी करू की नये याबाबत विचार केला जाईल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले होते.


हेही वाचा – Pfizer, AstraZeneca लसीच्या अँटीबॉडीज तीन महिन्यात होतायत कमी, लॅन्सेट रिपोर्ट