घरताज्या घडामोडीदेशात २४ तास मिळणार कोरोना लस

देशात २४ तास मिळणार कोरोना लस

Subscribe

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले जाहीर

देशात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या लसीकरणाच्या या टप्पात ६० वर्षावरील वृद्ध नागरिकांना आणि ४५ वर्षावरील दुर्धर आजाराशी सामना करणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. यासाठी केंद्राने आयुष्मान भारत, सीजीएचएस आणि राज्य सरकारशी जोडल्या गेलेल्या रुग्णालयांमध्ये लस दिली जात आहे. परंतु ही लसीकरण मोहिमेसाठी असणारे वेळेचे बंधन हटवण्यात आले आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना २४ तासात कधीही लसीकरण केंद्र जाऊन लस घेणे शक्य होणार आहे. देशातील लसीकरण केंद्रे २४ तास सुरु ठेवण्यासंदर्भातील हा निर्णय केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जाहीर केला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ट्विटवरुन याची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की, ”देशात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारने वेळेचे बंधन हटवले आहे. त्यामुळे देशातील नागरिक आपल्या सोईनुसार २४ तासात कधीही जाऊन लस घेऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांच्या आरोग्याची आणि वेळेची किंमत जाणतात.”

- Advertisement -

त्यामुळे नागरिकांना आता कोणत्याही वेळेत लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसीकरण केंद्रावरील गर्दी पाहतोय. त्यामुळे कोरोना नियमांचाच अनेक केंद्रावर फज्जा उडाला आहे. लसीकरणासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत वेळ दिला असल्याने नागरिकांनी सकाळपासूनच अनेक केंद्रावर गर्दी करत आहेत. मुंबईच्या बीकेसीतील कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांनी मोठ्याप्रमाणत गर्दी केली होती. त्यामुळे लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता. परंतु आता २४ तास कोरोना लसीकरण केंद्र सुरु राहिले तर नागरिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळणार आहे. देशातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कोरोना लस घेतली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. परंतु सामान्यांसाठी असलेले वेळेचे बंधन हटवल्याने नागरिक आपल्या सोयीनुसार लस घेऊन शकणार आहेत.


हेही वाचा- MBBSची अंतिम परीक्षा ऑफलाईनच होणार

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -