Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE corona vaccine : स्तनपान करणाऱ्या मातांसाठी लस सुरक्षित आहे का? तज्ज्ञ म्हणतात...

corona vaccine : स्तनपान करणाऱ्या मातांसाठी लस सुरक्षित आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

Related Story

- Advertisement -

आपण सध्या गर्भवती आहात, स्तनपान देत आहात किंवा घरी बाळ आहे? किंवा जर गर्भधारणेची योजना आखत असाल तर तुमच्या मनात कोरोनाची लस घेतली पाहिजे किंवा नाही असे अनेक प्रश्न निर्माण होत असतील. भारतात कोरोना विषाणूचा मोठ्याप्रमाणात संसर्ग होत असल्याने अनेक गर्भवती महिलांना लसीकरणानंतरचा धोका, दुष्परिणाम ? स्तनपान करणाऱ्या महिलांना कोरोनाचा काय धोका आहे? लसीकरणानंतर गर्भधारणा होते का? गर्भपाताचा धोका तर नाही ना? अशा अनेक शंका उपस्थित केले जात आहे. या गर्भवती महिलांचा प्रश्नांना एका तज्ज्ञ डॉक्टरांनी महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.

कोरोना महामारीत किंवा या गंभीर साथीचा आजारात बहुतेक रुग्णांना मानसिक आधार देणे आवश्यक आहे. शिवाय कोणतीही पॅनिक परिस्थिती निर्माण न करता रुग्णांना आधाराची गरज असते. अनेकदा अपुरी माहितीमुळे कोरोनाबाबत भीती निर्माण केली जात आहे. यामुळे रुग्णांना बरे झाल्यानंतरही मानसिक आजारांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाविरोधात लढण्यासाठी लस सुरक्षित असून प्रत्येकाने लस घेतली पाहिजे असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. दरम्यान लस गर्भवती महिलांनाही लस सुरक्षित असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कारण बदलत्या कोरोना म्यूटेशनमुळे रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी होत आहे. इतर सामान्य महिलांपेक्षा गर्भवती महिलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी लक्ष एक सुरक्षित उपाय असल्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. बाळाच्या विकासासाठी गर्भधारणेचे पहिले १२ आठवडे गर्भवती महिलेसाठी सर्वात महत्वाचे असतात. त्यामुळे काही गर्भवती स्त्रिया लसीकरण होईपर्यंत प्रतिक्षा करु शकतात.

- Advertisement -

गर्भवती मातांना गर्भधारणेमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यास धोका अधिक वाढतो. त्यामुळे बाळाचा अकाली जन्म होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच गर्भवती महिलांनी गर्भधारणेच्या तिमाहीत (28 आठवड्यांपर्यंत) प्रवेश करण्यापूर्वी लस घेऊ शकतात. परंतु याचा अर्थ असा नाही की, गर्भधारणेसंबंधित इतर लस गमावल्या पाहिजेत. स्तनपान करणाऱ्या मातांनी लक्षणे नसल्यास कोणताही औषधे घेऊ नका. जर लक्षणे दिसल्यास आपण डॉक्टरांचा सल्ल्यानुसार, रक्ताची चाचणी (CBC), सी- रिएक्टिव प्रोटीन (CRP) रॅन्डम ब्लड टेस्टसह डि-डायमर आणि इंटरलेयूकिन 6 (IL-6) पातळी अशा चाचण्या करुन शरीरात विषाणूचा काही परिणाम झाला आहे किंवा नाही हे समजून घेणे आवश्यक आहे, दरम्यान संसर्ग झालेल्या गर्भवती मातांचे बरे होण्याचे प्रमाण ९९ टक्के असून फक्त १ टक्केचं गर्भवती महिलांना रुग्णालयात भर्ती करावे लागते.

स्तनपान करणाऱ्या महिलांवर लसीकरणाचा दुष्परिणाम होत असल्याचा कोणताही डेटा अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे आई आणि बाळासाठी लस फायदेशीर ठरत आहे. दरम्यान गर्भवती महिलांना कोणती लस दिली पाहिजे याबाबत काही नियम नाहीत. परंतु गर्भवती महिलेची लस घेण्यास सहमती असल्यास लस दिली जात आहे. तसेच गर्भवती महिलांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर लसीचा दोन डोस पूर्ण करावा असाही सल्ला तज्ज्ञांनी दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान गर्भवती महिलांना लस घेण्यासाठी जाताना सामाजिक अंतराचे पालन करत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच १४ दिवसांचा आता इतर कोणताही लस घेऊ नये असाही सल्ला तज्ज्ञ देतात. स्तनपान करणाऱ्या मातांना लसीकरणानंतर कोणताही धोका नाही. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या मातांनी न घाबरता लस घ्यावी, दरम्यान गरोदरपणात लस घेतल्याने शरारीत विषाणूविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढते यामुळे बाळालाही कोणता धोका निर्माण होत नाही.

दरम्यान लस घेतल्यानंतरही तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असल्यास यावर लसीकरणाचा कोणताही परिणाम होणार आहे. जर असे वाटल्यास लसीकरणाचा काही काळानंतर तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करु शकता. कारण लसीकरणानंतर प्रजनक्षमतेवर कोणताही परिणाम झाला आहे असा पुरावा अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान लसीकरणानंतर ४५ दिवसानंतर तुम्ही प्रजननासंबंधीत समस्येवर पुन्हा उपचार सुरु करु शकता. जरी बहुतेक गर्भवती महिलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळतात, तिसऱ्या महिन्यात बाळाची वाढ होत असल्याने शरीरात अनेक बदल घडतात. त्यामुळे गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे संसर्गापासून वाचण्यासाठी गर्भवती महिलांनी सामाजिक अंतर पाळत काळजी घेतली पाहिजे.

नेहमी लक्षात ठेवा लसीकरणानंतरही आपल्याला सौम्य ताप, डोकेदुखी, उलटी, अंगदुखी सारखी लक्षणे दिसतात. त्यामुळे लसीकरणानंतर कोरोनाचा गंभीर लक्षणांपासून वाचत रुग्णालयात भर्ती होण्याची गरज भासणार नाही. परंतु मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आणि हात स्वच्छ धुणे महत्वाचे आहे. तसेच कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण ही महत्त्वाची गोष्ट आहे. कोरोनाचा वाढत्या प्रार्दुभावामुळे लसीकरण न करणे चुकीचे असल्याने स्वत;ची नोंदणी करून लस घ्यावी.


 

- Advertisement -