घरCORONA UPDATEकोरोना एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार, उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

कोरोना एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार, उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

Subscribe

देशात कोरोना विषाणूने हैदोस घातला असून दररोज हजारो रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे देशात कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा जीव तोडून प्रयत्न करत आहे. मात्र या परिस्थिती भाजपा नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्मंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचे वादग्रस्त विधान समोर येत आहे. ‘कोरोना व्हायरसही एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे.’ असे अजब वक्तव्य रावत यांनी केले आहे. रवत यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होतोय.

दर्शनी पाहता कोरोना व्हायरसही एक जीव आहे. त्यामुळे इतर लोकांप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकाप आहे. परंतु आपण मनुष्यप्राणी स्वत:ला जास्तच बुद्धीमान समजतोय आणि त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हा कोरोना विषाणू स्वत:चे सतत रुप बदलत आहे. त्यामुळे मनुष्याला जर सुरक्षित राहायचे असेल तर त्याने विषाणूला मागे टाकण्याची गरज आहे. असे वादग्रस्त विधान त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केले आहे. राव यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियातून अनेक समिश्र प्रतिक्रिया उमटत असून युजर्स त्यांना ट्रोल करत आहेत.

- Advertisement -

यावर एका युजर्सनी प्रतिक्रया दिली की, ‘आपला देश आज जगातील सर्वात कठीण परिस्थितीतून का जात असेल, हे एव्हाना कळलंच असेल’ तसंच ‘या विषाणूच्या जीवाला सेंट्रल विस्टामध्ये आश्रय दिला गेला पाहिजे’, त्यामुळे अनेक प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियातून व्यक्त होत असून अनेक राजकीय नेतेही रावत यांच्यावर टीका करत आहेत.


 

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -