घरCORONA UPDATEनिर्लज्ज! कोरोनापासून वाचवणाऱ्या डॉक्टरचाच मृत्यू, लोकांची मृतदेहावर दगडफेक!

निर्लज्ज! कोरोनापासून वाचवणाऱ्या डॉक्टरचाच मृत्यू, लोकांची मृतदेहावर दगडफेक!

Subscribe

पोलिसांच्या उपस्थितीत रात्री दीड वाजता मृतदेहाचे दफन करण्यात आले.

चेन्नईमध्ये कोरोना रूग्णाची सेवा करणाऱ्या ५५ वर्षीय डॉ. सिमोन हर्क्यूलिस यांचा मृत्यू झाला. मात्र रूग्णांची सेवा करणाऱ्या या डॉक्टरचा मृतदेह दफन करण्यासाठी त्यांच्या नातेवाईक आणि डॉक्टर मित्रांना कब्रस्तानासाठी भटकावं लागलं. एवढच नाही तर बाल्कनीमधून लोकांनी त्यांच्या अंगावर दगडं ही फेकली. यामध्ये शव घेऊन जाणारी अँम्ब्यूलन्सचा ड्रायव्हर, सफाईकर्मचारी जखमी झाले आहेत.

शेवटी पोलिसांच्या उपस्थितीत रात्री दीड वाजता मृतदेहाचे दफन करण्यात आले. चेन्नईमध्ये डॉ. सिमोन न्यू होप नावाचे हॉस्पिटल चालवतात. यावेळी डॉ. सिमोन यांना एका रूग्णाकडून कोरोनाचे संक्रमण झाले. त्यानंतर त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. चेन्नईच्या निगम नगरमध्ये त्यांच्या अंतिम संस्काराची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह घेऊन त्या कब्रस्तानात पोहचल्यावर साधारण ३०० लोकांच्या जमावाने विरोध करायला सुरूवात केली. लोकांना अनेक वेळा समजावून त्यांनी ऐकले नाही. शेवटी ते मृतदेह घू दुसऱ्या कब्रस्तानात गेले, तीथेही त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. शेवटी रात्री दीड वाजता पोलिसांच्या देखरेखेखाली मृतदेह दफन करण्यात आला.   पोलिसांनी या घटनेनंतर २० लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Job alert! त्वरा करा, लॉकडाऊनमध्ये नोकरीची सुवर्ण संधी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -