भारताकडून आलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनमुळे बरं वाटतंय – ब्राझीलचे राष्ट्रपती

कोरोना उपचारावर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे प्रभावी असल्याचे ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी म्हटले आहे.

ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो

देशभरासह जगभरात कोरोनाचा कहर सुरू असून सर्वच देशातील शास्त्रज्ञ कोरोना लस आणि औषधं तयार करण्यात गुंतले आहे. दरम्यान प्रामुख्याने मलेरियाच्या उपचारांसाठी तयार करण्यात आलेलं औषध कोरोना रुग्णांच्या उपचारात देखील दिले जात आहे. तर कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपुर्वी ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर सुरू असलेल्या कोरोना उपचारादरम्यान हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध दिले गेले. तर त्यांनी कोरोना उपचारावर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे प्रभावी असल्याचे म्हटले आहे.

तसेच जैर बोलसोनारो यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध कोरोनावर प्रभावी ठरतंय, यासंदर्भात प्रशंसा करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये जैर बोलसोनारो यांनी म्हटले आहे की, “मी येथे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा तिसरा डोस घेत आहे. मला बरं वाटतंय. हे औषध (टॅब्लेट) कोरोना रूग्णांवर नक्कीच प्रभावी आहे.”

दरम्यान, अमेरिकेनंतर ब्राझील जगातील कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर असून या जीवघेण्या कोरोना संकट काळात अमेरिका, ब्राझीलसह अनेक देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाची निर्यात करून भारताने जागतिक बंधुत्व निर्माण केले असल्याचे सांगितले जात आहे.


Corona: ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना कोरोनाची लागण!