घरताज्या घडामोडीBMC Budget 2021 Updates Live: १५ फेब्रुवारीपासून राज्यात महाविद्यालयं सुरू! शिक्षणमंत्र्यांची घोषणा

BMC Budget 2021 Updates Live: १५ फेब्रुवारीपासून राज्यात महाविद्यालयं सुरू! शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Subscribe

१५ फेब्रुवारीपासून राज्यात महाविद्यालयं सुरू! शिक्षणमंत्र्यांची घोषणा


‘धनंजय मुंडेंनी माझ्या मुलांना डांबून ठेवलंय’; करुणाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

- Advertisement -

एम एम सूर्यवंशी, सहसचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, यांची नियुक्ती महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर या पदावर,

राहुल रेखावार यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय ग्रामीण जीवननोत्ती अभियान, नवी मुंबई या रिक्त पदावर

- Advertisement -

निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका, अकोला या रिक्त पदावर


BMC Budget 2021 : मुंबई शहर नियोजन प्राधिकरणाची जबाबदारी महापालिकेला द्यावी – आयुक्त


  • मालमता कर थकबाकी वसुली द्वारे उत्पन्नात वाढ करण्याचा विचार

  • कोरोनामुळे मुंबई महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम, उत्पन्न वाढीसाठी सेवा शुल्कात वाढ करणार
  • बेस्ट उपक्रमातील कोविड १९चा महमारीमध्ये कर्तव्य बजावताणा मृत्यू झलेल्या कर्मचार्यांच्या प्रत्येक कुटुंबाला ५० लाखाचे अर्थसहाय्य
  • संसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी कस्तुरबा रुग्णालयाची क्षमता वाढावंNयासाठी नवीन इमारत बांधान्यासाठी निविदा प्रस्तावित

  • ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, दिव्यांग यासंख्या व्यक्तींना घरातच आरोग्य सेवा देण्यासाठी ओपीडी ऑन व्हील योजनेअंतर्गत शहर, पूर्व, पशचिम उपनगरांमध्ये मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देणार

  • ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक चाचण्या घरातच करण्यासाठी युनानी, आयुर्वेद औषधपद्धतीचा वापर करणार, यासाठी ५ कोटींची तरतूद

कोविड कळात कर्मचार्याऱ्यांना प्रतिदिन 300 रु भत्ता देण्यात आला. 31 डिसेंबर 2020 पर्यंत 417 कोटी खर्च आला.


क्षयरोग, एड्स, मलेरिया, डेंग्यू, लेप्टो यासाठी 2030 पर्यंत 100 टक्के लसीकरण


निधन झालेल्या कोविड योद्धांच्या कुटुंबियांना 50 लाख सानुग्रह सहाय्य देणार


  • सायन, केईएम नायर रुग्णालयात सिटी स्कॅन सुविधेसाठी 8 ते 10 कोटी खर्च

  • सर्व वैद्यकीय महाविद्यालये व प्रमुख रुग्णालयांमधील यंत्रसामुग्री करण्यासाठी 96 कोटींची तरतूद

भारतीय नर्सिंग परिषदेच्या निर्देशानुसार माहापालिकेचे सर्व नर्सिंग स्कुलचे नर्सिंग कॉलेजमध्ये परावर्तित करण्यात येणार, यासाठी 29 कोटी खर्च


यंदाचा अर्थसंकल्प हा ३९,०३८.८३ कोटींचा आहे, गतवर्षीच्या तुलनेत ५,५९७. ८१ रुपयांनी जास्त आहे. गतवर्षी ३३,४४१.०२ कोटी रुपयांचा होता.


मुंबई महापालिकेचा 39 हजार 038.83 कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई – जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या, देशातील श्रीमंत अशा मुंबई शहराच्या महापालिकेचा 39 हजार 038.83 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पालिका आयुक्त इकबाल सिंग यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला.


सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे आस्थापना खर्चामध्ये सुद्धा वाढ झाली आहे. – इकबाल चहल


कोरोनाला आटोक्यात आणण्यात आम्ही यशस्वी – इकबाल चहल


आता आयुक्त इकबाल चहल अर्थसंकल्प वाचन करीत आहेत


महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा, अतिरिक्त आयुक्त पी. वेला रासू आदी मान्यवर ,स्थायी समिती सदस्य उपस्थित होते


मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचा अर्थसंकल्पाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महापालिका आयुक्त इकबाल चहल यांचे स्वागत करण्यात आले.


  • 10 नवीन CBSE  बोर्डाच्या शाळा सुरू करणारमहानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या CBSE बोर्डाच्या शाळांना शैक्षणिक वर्ष 20-21  मध्ये प्रचंड प्रतिसाद मिळालास्थानिक जनतेचं मत जाणून घेत 21-22 या शैक्षणिक वर्षांपासून CBSE बोर्डाच्या शाळा सुरू करण्यासाठी शहरातील 10 ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत.
    यामध्ये शहर विभागातील – २
    पश्चिम उपनगरांत – ३
    पूर्व उपनगरांत – ५CBSE  मंडळाच्या पोट कायद्यानुसार 40 विद्यार्थ्यांची 1 तुकडी याप्रमाणे ज्युनिअर केजी, सिनियर केजी  ते इयत्ता 6 वी पर्यंत शाळा सुरू होतील
    फेब्रुवारी 2021 पासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार


  • विद्यार्थिनींसाठी मदत ठेव योजना( मुलींचा उपस्थीत भत्ता)
    इयत्ता 8 वीच्या 13550 मुलीना 5000 रकमेची मदत ठेव योजना.भरतीय डाक विभागद्वारे प्रमाणपत्रे देण्याची कर्यवाही सुरु
  • उच्च प्राथमिक शाळा भविष्यात 10 वि पर्यंत वाढवण्यात येईल. लवकरच 24 माध्यमिक शाळा सुरू करण्याचा महापालिकेचा मानस
  • 279 मराठी माध्यमाच्या बालवाडी वर्गांमध्ये 6 महिन्याच्या कालावधीसाठी रॉकेट लर्निंग व आकांक्षा फाऊंडेशन या एनजीओमार्फत प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यात येणार

महानगरपालिका शाळा सुरू करताना एसओपीनुसार हँड सॅनिटायझर, थर्मोमीटर, हँडवॉश , पल्स ऑक्सीमिटर ,मास्क साठी 15. 90 कोटींची तरतूद


  • मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयसाठी ३५ लाख अनुदान
  • दि एशियाटिक सोसायटी साठी ५ लाख अनुदान

  • मास्क वाटप आणि अन्न धान्य वाटप प्राथमिक शाळा तरतूद ४० लाख
  • माध्यमिक तरतूद २० लाख

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे नाव बदलणार

  • ‘मुंबई पब्लिक स्कुल’ असे पुन: नामानिधन करून नवीन लोगोसह संबोधणार
  • महानगर पालिकेच्या शाळांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी पालिकेच्या शाळांचं नाव बदलणार
  • प्राथमिक विभागाच्या 963 आणि माध्यमिक  विभागाच्या 224 मनपा शाळांच्या मूळ नावासह मुंबई पब्लिक स्कुल (M.P.S.) असं संबोधन्यात येणार
  • MPS साठी नव्या लोगोची निर्मिती करण्यात आली आहे

विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी 25 शाळांमध्ये जी क्लास एप्लिकेशन उपलब्ध केले.51 शिक्षकांना व 210 विद्यार्थ्याना ऑनलाइन प्रशिक्षण दिले


डिजिटल क्लासरूमची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून प्रथमिकसाठी 23.58 तर माध्यमिकसाठी 5 कोटींची तरतूद


पहिले अक्षर कार्यक्रमांतर्गत 12 विभागातील 500 टीचर्स व 3000 शिक्षकांना प्रशिक्षण


दुसऱ्या टप्प्यात 606 शिकढकणा ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार. उर्वरित शिक्षाकना जुलैपासून प्रशिक्षण


भाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर 25 शाळांमध्ये गुरुजी वर्ल्ड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांनी Glass app विकसित


  • पुढील वर्षात १० नवीन सीबीएसई शाळा सुरू करणार.
  • बालवाडी सक्षमीकरण साठी स्वयंसेवी संस्थांशी करार
  • २४ शाळा दहावीपर्यंत शिक्षण सुविधा वाढविणार

महानगरपालिका माध्यमिक शाळांत मार्च २०२०पासून परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या २५ विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी प्रतिवर्षी २५ हजार किना शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेले (ट्युशन शुल्क) फेण्यात येणार आहे. मार्च २०२१ पर्यंत शालेय इमारती, दुरुस्ती, पुनर्बांधणीची ४३ मोठी कामे आणि ८ कामे पुढील आर्थिक वर्षात करण्यात येणार आहेत.


मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या सुरुवातील शिक्षण विभागाचे बजेट जाहीर करण्यात आले. शिक्षण विभागासाठी २,९४५ कोटींचे बजेट जाहीर करण्यात आले आहे.


हायब्रिट मॉडेल कोरोना काळात वापरले – रमेश पवार

  • ४० युट्यूबट माध्यमातून शिक्षणाची सुविधा
  • युट्यूब चॅनेलला १ लाख पेक्षा अधिक लोकांची स्विकृती
  • केंद्र सरकारने घेतली दखल

सह आयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांना शिक्षण खात्याचा सन२०२१-२२ चा अर्थसंकल्प दुपारी १२.२० वाजता सादर केला.


थोड्याच वेळात मुंबई महापालिकेच्या बजेटला होणार सुरुवात होणार आहे.


काल (मंंगळवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची तातडीने आज बैठक बोलावली. या बैठकीला सुरुवात झाली आहे.


गेल्या २४ तासांत देशात ११ हजार ३९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ११० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात १४ हजार २२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ७ लाख ७७ हजार २८४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५४ हजार ५९६ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ४ लाख ६२ हजार ६३१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या १ लाख ६० हजार ५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४१ लाख ३८ हजार ९१८ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.


शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत आजही गदारोळ झाला आहे. आपच्या तीन खासदारांना दिवसभरासाठी करण्यात निलंबित करण्यात आले आहे. सभापती व्यंकय्या नायडू यांनी ही कारवाई केली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी मराठवाडा दौऱ्यावर जाणार असून ९ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीचा आढावा घेणार आहेत.


मुंबई सध्या आगीचे सत्र सुरू आहे. मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरात भीषण आग लागल्याचे समोर आले आले आहे. सिंधिया हाऊसच्या सर्वात वरच्या मजल्यावर ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या घटनास्थळी ५ गाड्या दाखल झाल्या आहेत. या भीषण आगीवर अग्निशमन दलाचे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माहितीनुसार या इमारतीमध्ये आयकर विभागाचे कार्यालय आहे.


जगातील कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा १० कोटी ४३ लाख ७८ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत २२ लाख ६२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ७ कोटी ६२ लाख २७ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -