घरताज्या घडामोडीLive Update: दिल्लीसह ५ राज्यात भूकंपाचे धक्के

Live Update: दिल्लीसह ५ राज्यात भूकंपाचे धक्के

Subscribe

दिल्लीसह ५ राज्यात भूकंपाचे जोरदार धक्के


पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: चित्रा वाघ यांच्याकडून मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप

- Advertisement -

अविनाश भोसलेंनी घेतली मुंबई हायकोर्टात धाव; सोमवारी होणार सुनावणी


तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाक्यांच्या फॅक्ट्रीत स्फोट, 8 जणांचा मृत्यू

- Advertisement -

राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला होणार आहे. उद्यापासून अर्थसंकल्पावर काम सुरू होणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित कपवार यांनी दिली आहे.


नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. बाळासाहेब थोरात यांच्याकडून पटोले यांनी सुत्र स्वीकारली. यावेळी काँग्रेस प्रभार एच.के. पाटील, सुशील कुमार शिंदे असे अनेक नेते उपस्थित होते.


आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका कोर्टाने ठेवला आहे. चंदा कोचर यांनी मुंबई सत्र न्यायालयात हजेरी लावली होती. आज वेणुगोपाळ दुध यांनी कोर्टात हजेर राहावे, असे कोर्टाचे आदेश होते.


जेजुरीतल्या अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज पालघर दौरा आहे. सध्या उद्धव ठाकरे पाघलरमध्ये पोहोचले असून भाजपचा गड असणाऱ्या जव्हार गावांमध्ये त्यांचा दौरा असणार आहे.


राष्ट्रवादीचे सर्वसर्वो शरद पवार यांच्या उद्याच्या कार्यक्रमा आधीच जेजुरीतल्या अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं गोपीचंद पडळकरांकडून अनावरण झाल्याची माहिती समोर येत आहे. उद्या शरद पवारांचा कार्यक्रमा नियोजित करण्यात आला होता. पण त्यापूर्वी गोपीचंद पडळकरांनी जेजुरीतल्या अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण केलं.


धूप पेटवताना आग लागल्याची घटना मुंबईजवळच्या वसईतल्या एव्हरशाईन सिटी परिसरात घडल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण घर जळून खाक झाले असून एव्हरशाईन परिसरात धुपामुळे अग्नितांडव झाला आहे.


जगात अजूनही कोरोनाचे सावट कायम आहे. कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या १० कोटी ८२ लाख ८२ हजार पार झाली आहे. यापैकी आतापर्यंत २३ लाख ७७ हजार जणांचा मृत्यू झाला असून ८ कोटी ३ लाख १७ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -