घरताज्या घडामोडीLive Update: देशात २४ तासांत आढळले १४,०६४ नवे रुग्ण, १३७ जणांचा मृत्यू!

Live Update: देशात २४ तासांत आढळले १४,०६४ नवे रुग्ण, १३७ जणांचा मृत्यू!

Subscribe

देशात गेल्या २४ तासांत १४ हजार ६४ नवे रुग्ण आढळले असून १७ हजार ४११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच १३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी ५ लाख ८१ हजार ८३७वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५२ हजार ५५६ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ कोटी २ लाक २८ हजार ७५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २ लाख ५२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

१८ जानेवारीपर्यंत देशात १८ कोटी ७८ लाख २ हजार ८२७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असून यापैकी काल दिवसभरात ७ लाख ७ हजार ७९१ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

- Advertisement -

जगभरात अनेक देशात कोरोना लसीकरण सुरू आहे. तरी देखील कोरोनाबाधितांची संख्या काही घटताना दिसत नाही आहे. वर्ल्डोमीटरनुसार, जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ९ कोटी ३९ लाख ९० हजारांहून अधिक झाली. यापैकी आतापर्यंत २० लाख ४८ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ६ कोटी ८६ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -