घरताज्या घडामोडीLive Update: रायगडच्या महाड MIDCमध्ये वायू गळती

Live Update: रायगडच्या महाड MIDCमध्ये वायू गळती

Subscribe

रायगडच्या महाड MIDCमध्ये वायू गळती झाल्याने काही कामगार बाधित झाले आहे. ईडों अमेनिस कंपनीमध्ये वायू गळती झाली आहे. वायू गळतीत बाधित झालेल्या कामगारांना रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. यात वायू गळतीमुळे ७ कर्मचारी बाधित झाले आहेत.


पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला आज आग लागली. या आगीत ५ जणांचा मृत्यू झाला. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. सीरमच्या अदर पूनावाला यांच्याशी त्यांनी आगीबाबत चर्चा केली. उद्या दुपारी मुख्यमंत्री घटनास्थळी भेट देणार आहेत.

- Advertisement -

पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट इमारतीला लागलेल्या आगीनंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज 7:30 वाजण्याच्या सुमारास सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.


पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाच मृतदेह सापडल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -

सीरम इंस्टिट्यूटचे अदर पूनावाला यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. त्यात त्यांनी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याला प्राधान्य दिल्याचे सांगितले आहे. सीरम इस्टिट्यूटच्या नव्या इमारतील लागलेल्या आगीतून तीन जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.


सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील आग आटोक्यात आल्याचे समोर आले आहेत.


सिरम इन्स्टिट्यूटच्या आग लागलेल्या नव्या इमारतीतून तीन जणांचा सुखरुप बाहरे काढण्यात आले.


पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ३ गाड्या दाखल झाल्या आहेत.


बेळगावात मराठी भाषिकांनी आयोजित केलेला मोर्चा रद्द झाला. मात्र तरीही अनेक शिवसैनिक आज कर्नाटकात दाखल होत तीव्र निषेध करत आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटक सीमेवरील पोहोचत कर्नाटकमध्ये भगवा फडकवल्याशिवाय मागे हटणार नाही अशा ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण झाले. सविस्तर वाचा 


एमपीएससीने (MPSC) सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेबाबत मुख्य सचिव माहिती घेणार आहेत. तसेच कुणी जाणूनबुजून केलं आहे का? याचा तपास देखील करणार आहे. एमपीएससी संदर्भात आम्ही योग्य मार्ग काढू, असे अजित पवार म्हणाले आहेत.


अर्णव गोस्वामीच्या Whatsapp चॅट प्रकरणी आज राष्ट्रवादी कार्यकर्ते आंदोलन करत असून अर्णववर केंद्राने कारवाई करा अशी मागणी करत आहेत.


देशात गेल्या २४ तासांत १५ हजार २२३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १५१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात १९ हजार ९६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ६ लाख १० हजार ८८३वर पोहोचली. यापैकी १ लाख ५२ हजार ८६९ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी २ लाख ६५ हजार ७०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या १ लाख ९२ हजार ३०८ जणांचावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८ लाख ६ हजार ४८३ जण कोरोनाची लस दिली गेली आहे.


ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट टीम मायदेशात परतली आहे. मुंबई विमानतळावर भारतीय टीम पोहोचली असून मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांचे स्वागत करत आहे. तसेच स्वागतासाठी मुंबई विमानतळा बाहेर चाहत्यांची गर्दी झाली आङे.


बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने बांधलेल्या अनधिकृत हॉटेलप्रकरणी मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती. त्याच संबंधित मुंबई उच्च न्यायालय आज आपला निर्णय सुनावणार आहे.


अनेक देशात लस आली असली तरी जगातील कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ९ कोटी ७३ लाखांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत २० लाख ८३ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ६ कोटी ९८ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -