घरताज्या घडामोडीLive Update: पालिकेच्या हेरिटेज इमारतीमध्ये 'हेरिटेज वॉक'

Live Update: पालिकेच्या हेरिटेज इमारतीमध्ये ‘हेरिटेज वॉक’

Subscribe

“शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार”

“शेतकरी आंदोलनाला ‌केंद्राने प्रतिसाद द्यायला हवा होता. शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार. शेतकरी कायद्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा. अण्णा हजारेंवर उपोषणाची वेळ आली. हे सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकरी मोडला तर देश मोडेल. शेतकरी ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागलं आहे. आपला शेतकरी कधीच हिंसा करत नाही. गालबोट लावण्यासाठी कोणीतरी शिरलं आणि आंदोलनास गालबोट लावण्याचा प्रयत्न यातून निश्चित झाला” अशी शक्यता देखील अजित पवारांनी वर्तवली. दरम्यान, अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

…म्हणून BCCI ने रद्द केली सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात BCCI चे सचिव जय शहा यांनी भारतीय क्रिकेटपटू घडवणारी सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी कळवली आहे. दरम्यान, सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने घेतला असून यासह रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज ४५ हजार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील BCCI ने घेतला आहे.

Recruitment: Reliance JIO,Indian Oil मध्ये नोकरी करायची आहे? वाचा सविस्तर

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकं बेरोजगार झालेत. तर काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात देखील केली. मात्र बेरोजगार किंवा जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी Reliance jio आणि Indian Oil मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. भारतात सर्वात मोठी, नावलौकिक असणारी टेलीकॉम कंपनी अर्थात रिलायन्स जिओने वेगवेगळ्या पदांकरता भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या कंपनीत होणाऱ्या भरती प्रक्रियेत अनुभवी किंवा फ्रेशर्स उमेदवारांनादेखील अर्ज करता येणार आहे. रिलायन्स जिओने २०० हून अधिक जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. जिओ या कंपनीने https://careers.jio.com वर याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे.


पिस्तूल दाखवून शिवसैनिकांनी केली गाडी ओव्हरटेक

वाहतूक कोंडीतून सुटका करुन घेण्यासाठी एका कार चालकाने आणि त्याच्या सहकार्याने पिसतूल दाखलल्याचे व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर हा प्रकार घडला आहे. महत्त्वाचे म्हणजे या पिस्तूलबाज वाहनचालकाच्या गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, या गाडीत बसलेला व्यक्ती शिवसैनिक असल्याचे अद्याप समोर आलेले नाही.


“अण्णा नक्की कोणाच्या बाजूने?”; सामनातून शिवसेनेचा संतप्त सवाल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्यापासून होणाऱ्या आपल्या उपोषणाला स्थगिती दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले. अण्णा हजारे ३० जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या शिष्टाईला यश आले असल्याची चर्चा आहे. मात्र अण्णा हजारे यांच्या आंदोलन स्थगितीच्या निर्णयावर शंका उपस्थित केली जात असून, शिवसेनेनेही अण्णा हजारे यांना सवाल केले आहेत. तर शिवसेनेने अण्णांच्या या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. कृषी कायद्यांबाबत त्यांची भूमिका काय आहे? या शेतकऱ्यांना अण्णांचा पाठिंबा आहे का? अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला कळायला हवीत,’ असा टोला शिवसेनेने लगावला आहे.


फी वाढीविरोधात पालकांचे आंदोलन

aggressive parents against fee hike


पालिकेच्या हेरिटेज इमारतीमध्ये ‘हेरिटेज वॉक’

मुंबई महापालिका हेरिटेज इमारतीमध्ये अखेर आजपासून ‘हेरिटेज वॉक’ ला सुरुवात झाली आहे. या इमारतीचा इतिहास बघण्यासाखा आणि ऐकण्यासारखा आहे. जास्तीत जास्त पर्यटक याठिकाणी यायला हवेत. मुंबईत लपलेल्या पुरातन वास्तू पर्यटकांसाठी लवकरच खुल्या करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील पुरातन दुमजली इमारत ही १२८ वर्षे जुनी इमारत आहे. या इमारतीत हवा खेळती राहते आणि सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात येत असल्याने दिवसा विजेची जास्त गरज भासत नाही. अशा प्रकारची पर्यावरणाला अनुकूल जुनी इमारत आहे. २८ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ‘हेरिटेज वॉक’ची संकल्पना सत्यात उतरविणारे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही पर्यटक आणि गाईड यांच्यासमवेत मुंबई महापालिकेच्या पुरातन इमारतीची सफर केली.

Mumbai Municipal Corporation Headquarters to be open for tourism
 

दिल्ली बॉम्बस्फोट : ‘हा तर फक्त ट्रेलर’; चिठ्ठीमुळे खळबळ

अब्दुल कलाम मार्गावरील इस्रायली दूतावासाच्या इमारतीपासून काही मीटर अंतरावर शुक्रवारी सायंकाळी ५.०५ मिनिटांनी स्फोट झाला. या स्फोटात कोणीही जखमी झाले नसून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन वाहनांच्या काचा फुटल्याचे समोर आले आहे. एकीकडे दिल्लीत शेतकर्‍यांच्या हिंसक आंदोलनामुळे अगोदरच तेथे तणाव असताना या स्फोटामुळे दिल्ली पुन्हा हादरली आहे. त्यातच आता त्याठिकाणी पोलिसांना एक लिफाफा आढळून आला असून त्यात एक चिठ्ठी आढळली आहे. त्या चिठ्ठीत एक मजकूर लिहिण्यात आला असून त्या मजकूरामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या चिठ्ठीत ‘हा तर फक्त ट्रेलर’ आहे, असा इशारा देण्यात आला आहे.


एल्गार परिषद काही वेळात सुरू होणार आहे. येथे पोलिसांचा मोठा ताफा वाढवण्यात आला असून गणेश कला मंदिरात ही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.परिषदेला येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून केली जातीये.


राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहकांना बिल भरा नाहीतर लाईट कापली जाणार, असा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे.


यंदा खासदार मारणार ५ स्टार हॉटेलच्या जेवणावर ताव

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात झाली. देशाचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. दरम्यान, यंदा संसदेत एक मोठा ऐतिहासिक बदल होणार असून हा बदल भोजनाबाबत आहे. यंदा खासदार संसद भवन संकुलाच्या कॅन्टीनमधील जेवणाचा आस्वाद घेणार नाही. तर चक्क फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणार ताव मारणार आहेत. गेल्या ५२ वर्षांपासून अर्थसंकल्पाच्या वेळी उत्तर रेल्वेकडून संसदेच्या खासदारांची जेवणाची सोय केली जायची. मात्र, यंदा ही परंपरा मोडीत काढण्यात आली आहे.


नारायण राणेंना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे पाठबळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच शिवसेनेवर सातत्याने तोंडसुख घेणारे कोकणातील आक्रमक नेते नारायण राणे यांना भाजपाच्या दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाने भक्कम पाठबळ दिल्याने व त्याप्रमाणात शिवसेना नेतृत्वाकडून कोकणातील नेत्यांची मात्र तुलनेने हेळसांड होत असल्याने कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आमदार अस्वस्थ झाले आहेत. ही नाराजी लवकरच मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालण्यात येणार असल्याची चर्चा शिवसेना गोटात आहे.


देशाचा विकासदर ११ टक्के

देशाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात चालू वर्षात म्हणजे २०२०-२१ मध्ये आर्थिक विकासदर उणे ७.७ टक्के इतका राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०२१-२२ या पुढल्या वर्षात विकासदर ११ टक्क्यांपर्यंत झेपावेल, असे भाकीत करण्यात आले आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत ‘व्ही’शेप सुधारणा होण्याचा अंदाज आहे. कोरोनाचे संकट आणि अनेक महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेमध्ये घट झाल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम् यांनी शुक्रवारी २०२०-२१ सालचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. त्यापूर्वी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -