घरताज्या घडामोडीLive Update: मुंबई-वर्सोवात सिलेंडरच्या गोदामाला आग

Live Update: मुंबई-वर्सोवात सिलेंडरच्या गोदामाला आग

Subscribe

स्वप्न होईल लवकरच साकार

स्वत: चे घर तयार करायची स्वप्न पाहात असाल तर ते स्वप्न सत्यात साकारणे सोपे आहे. त्याच कारणही तसेच आहे. गेल्या एक आठवड्यांपासून सीमेंट पासून रेती लोखंडी रॉड आणि विटांच्या किंमतीतत सातत्याने घट होताना दिसत आहे.

- Advertisement -

SBIच्या खातेधारकांना २ लाख रुपयांचा फायदा, लवकरच येणार नवी स्किम

SBIच्या खातेधारकांसाठी मोठी खुशखबर आहे. SBI लवकरच खातेधारकांसाठी लवकरचं एका नवीन स्किम सुरु होणार आहे. जर तुमचे जनधन अकाउंट आहे किंवा तुम्ही जनधन अकाउंट सुरु करणार असाल तर या प्लॅनचा तुम्हाला सर्वात जास्त फायदा होणार आहे. SBI खातेधारकांना तब्बल २ लाख रुपयांचा फायदा करुन देणार आहे. SBI ने ट्विटच्या माध्यामातून ही माहिती खातेधारकांना दिली आहे. जर तुम्ही SBIच्या जनधन कार्डसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला २ लाख रुपयांपर्यंत दुर्घटना विमा मिळेल. त्यासाठी तम्हाला जनधन कार्ड ९० दिवसांत एकदा तरी स्वाइप करावे लागेल. त्यानंतर तुम्ही २ लाख रुपयांचा दुर्घटना विमा मिळवू शकता.

- Advertisement -

पुणे विद्यापीठाच्या परिक्षांच्या तारखा जाहीर

पुणे विद्यापीठाच्या परीक्षांच्या अखेर तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, आता या परीक्षा घरातून ऑनलाईन पद्धतीने होणार की महाविद्यालय स्तरावर होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याबाबतचा निर्णय उपसमितीचा अहवाल आल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात घेतला जाणार आहे.


Video – ‘नरेंद्र मोदी जिंदाबाद’ची घोषणा देणाऱ्या व्यक्तीची केली धुलाई

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहे. गेले अनेक दिवस आंदोलन सुरु असूनही यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यातच प्रजासत्ताक दिनी या आंदोलनाने हिंसक वळणही घेतले. परंतु, या कायद्याबाबत केंद्र सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे आता राजकीय पक्ष देखील शेतकऱ्यांचे समर्थन करत त्यांना पाठिंबा देत आहे. याच पार्श्वभूमीवर, छत्तीसगड येथे नुकतेच काँग्रेसकडून कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. त्या दरम्यान, एका व्यक्तीने ‘नरेंद्र मोदी जिंदाबाद’अशी घोषणा दिली आणि हिच घोषणा त्याला महागात पडली. घोषणा देताच त्या व्यक्तीला काँग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.


देवभूमीतील हाहाकार नैसर्गिक आपत्ती नव्हती – सामनाचा केंद्रावर निशाणा

हिमालयातील देवभूमीत मागील काही वर्षांपासून अनेक जल प्रलय, नैसर्गिक आपत्ती घडली आहे. काही दिवसांपुर्वी उत्तराखंडमधील चमोलीत हिमकडा कोसळला. या हिमकड्यात अनेकजणांचा मृत्यू झाला. तर शेकडोंहून अधिक कामगार आणि रहिवाशी बेपत्ता आहेत. यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. आपणच आपल्या हाताने पायावर मारलेल्या कुऱ्हाडीमुळे हे देवभूमीत जलप्रलय आणि नैसर्गिक आपत्ती घडत आहेत. एकीकडे उत्तराखंडला देवभूमी म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच देवभूमीत खोदकाम करुन जीवघेणे प्रकल्प उभे करायेच याला काय म्हणावे? पुन्हा अशा दुर्घटना घडल्यानंतर त्याला ती नैसर्गिक प्रकोप ठरविणे हे तर थोतांडच आहे. त्यामुळे देवभूमीत जो काही हाहाकार माजला आहे ती नैसर्गिक आपत्ती नव्हतीच असे सामनातून म्हटले आहे. आपणच आपल्या हाताने पायावर कुऱ्हाड मारतो आहे. हिमालयातील हाहाकार थांबवण्यासाठी तेथील प्रकल्पांचे प्रहार थांबवावे लागतील. देवभूमीत सुरु असलेल्या ऊर्जा प्रकल्पांवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून टीका करण्यात आली आहे.


मुंबईतील पॉर्न रॅकेटबाबत मोठा खुलासा

पॉर्न व्हिडिओ प्रकरणात गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडून अटकसत्र सुरू असताना खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. या पॉर्न रॅकेटकडून हिंदी, इंग्रजीसह मराठी पॉर्न व्हिडिओ देखील बनवण्यात येत होते. तसेच या रॅकेटमध्ये अनेक बड्या व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. लवकरच मुंबई पोलिसांकडून त्याबाबत खुलासा होणार आहे. गेली अनेक वर्षे हे पॉर्न रॅकेट मुंबईत कार्यरत असून तरुणींना फसवून त्यांना या पॉर्न व्हिडिओमध्ये जबरदस्तीने काम करण्यास प्रवृत्त केले जात होते. विशेष म्हणजे हे सर्व अश्लील व्हिडिओ या रॅकेटने कोरोना काळात तयार केल्याची माहिती उजेडात आली आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -