घरताज्या घडामोडीLive Update: परीक्षा पुढे गेलेली नाही पुढे जाऊ दिली जाणार नाही हे...

Live Update: परीक्षा पुढे गेलेली नाही पुढे जाऊ दिली जाणार नाही हे माझे वचन – मुख्यमंत्री

Subscribe

परीक्षा पुढे गेलेली नाही पुढे जाऊ दिली जाणार नाही हे माझे वचन – मुख्यमंत्री


परीक्षा घेणारा कर्मचारी वर्ग कोरोना नकारात्मक असला पाहिजे – मुख्यमंत्री

- Advertisement -

दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा सर्वात मोठी. त्यामुळे त्रिसूत्री पाळा लॉकडाऊन टाळा – मुख्यमंत्री


आरोग्य सुविधा राज्यात व्यवस्थित आहेत – मुख्यमंत्री

- Advertisement -

हात धुणे, मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे हे हिताचे आहे – मुख्यमंत्री


गरज भासल्यास पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल – मुख्यमंत्री


८० टक्के कोरोना बाधितांना संसर्गाची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे टेस्ट करुन घ्यायला घाबरु नका. कोरोना चाचणी करण्यास नकार देऊ नका – मुख्यमंत्री


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन परीक्षा घेण्यात येणार – मुख्यमंत्री


विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो – मुख्यमंत्री


परीक्षार्थ्यांनो वयोमर्यादेची काळजी करु नका – मुख्यमंत्री


कोणत्याही परीस्थिती विद्यार्थ्याच्या भावनांशी खेळायचे नाही – मुख्यमंत्री


लॉकडाऊन आजही टाळू शकतो – मुख्यमंत्री


परीक्षेवरुन विरोधकांनी राजकारण करु नये – मुख्यमंत्री


परीक्षा देताना विद्यार्थ्यांना दडपण नको – मुख्यमंत्री


विद्यार्थ्यांच्या भावनांशी सहमत – मुख्यमंत्री


परीक्षा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणार. कोरोना लस घेतलेले कर्मचारी MPSC परीक्षा घेतील – मुख्यमंत्री


उद्या MPSC परीक्षेसाठी तारीख जाहीर करण्यात येईल. ८ दिवसांमध्ये MPSC परीक्षा घेण्यात येईल मुख्यमंत्र्यांचे आश्वासन


MPSC परीक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे – मुख्यमंत्री


पिंपरी चिंचवड शहरात सर्व उद्याने बंद राहणार – पालिकेचा निर्णय

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व उद्याने बंद राहणार आहेत. शहरात काही दिवसांपूर्वी कोरोनाचे दिवसाला शंभरच्या आत रुग्ण आढळत होते. आता मात्र हाच आकडा सहाशे पार झालाय. म्हणून हा निर्णय महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी घेतलाय. ३१ मार्चपर्यंत हा निर्णय लागू असेल, पुढील परिस्थिती पाहून उद्याने खुले करण्याचा निर्णय होईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.


मुख्यमंत्री MPSC विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय लवकरच घेतील- वरुण सरदेसाई

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिनांक १४ मार्च रोजी होणार होती. या परीक्षेला केवळ ३ दिवस उरलेले असताना ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे भावविश्व उद्ध्वस्त झाले आहे. एमपीएससी परीक्षेसाठी वर्षानुवर्षे तयारी करणारे लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनी या निर्णयामुळे संतप्त झाले असून पुणे, संभाजीनगर तसंच राज्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहेत. उद्या या विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल अमित ठाकरेंनी उपस्थितीत केला आहे.


MPSC च्या बदलेल्या तारखांबाबत आजच निर्णय होण्याची शक्यता

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. आजच्या आजचं एमपीएससी परीक्षेबाबत आजच निर्णय होणार, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. एकीकडे विरोधी पक्षनेते मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेऊन परीक्षा घ्या, असं म्हणतात. विनायक मेटे एक भूमिका घेतात, गोपीचंद पडळकर एक भूमिका घेतात. याविषयावर राजकारण करु नये, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.


कोकण आरे तत्कालीन धारावी पोलीस स्टेशनचे निरीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्त रमेश नांगरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. (सविस्तर वाचा)


गोरेगाव (पश्चिम) विधानसभा क्षेत्रातील असंख्य महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी आज राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यावेळी स्वतः राजसाहेब ठाकरे, शर्मिला वहिनी आणि मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे आणि मी देखील उपस्थित होते.


MPSCची परीक्षा पुढे ढकळल्यामुळे पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.


नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढ असल्यामुळे १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. याबाबतची माहिती नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे.


मनुसख हिरेन प्रकरणातील संशयित पोलीस अधिकारी सचिन वाझे संध्याकाळी ७ वाजता आपली भूमिका मांडणार आहेत.


थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर जे.जे.रुग्णालयात पोहचून लस घेणार आहेत. तसेच त्यांची पत्नी रश्मी ठाकरे देखील लस टोचून घेणार आहेत. यावेळी नेत्रचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यावेळी उपस्थित राहणार आहे.


अंबरनाथमधील आर.के बिस्किट कंपनीला लागलेली आग आटोक्यात आली आहे


आज सकाळी ०५:४५ वाजताच्या सुमारास, आनंद नगर एम.आय.डी.सी., अंबरनाथ(पु.) येथे मे. आर. के. बिस्कीट कंपनीला भीषण आग लागली आहे. सदर घटनास्थळी अंबरनाथ व बदलापूर अग्नि.केंद्राचे एकूण ८ फायरवाहन उपस्थित असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर घटनेत अद्याप कोणालाही दुखापत नाही असे अंबरनाथ अग्नि. केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार अद्ययावत.


गेल्या २४ तासांत देशात २२ हजार ८५४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १२६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १२ लाख ८५ हजार ५६१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५८ हजार १८९ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे निवेदन नोंदविल आहे, अशी माहिती एटीएस अधिकाऱ्याने दिली आहे.


जगातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. वर्ल्डोमीटरनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ११ कोटी ८६ लाख २१ हजार पार गेली आहे. यापैकी आतापर्यंत २६ लाख ३१ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ९ कोटी ४२ लाख ३१ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -