Live Update: राज्यात आज १५ हजार ८१७ नव्या रुग्णांची नोंद

live update
लाईव्ह अपडेट

राज्यात आज १५ हजार ८१७ नव्या रुग्णांची नोंद, तर ५६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


सरकार चालवण्याची यांची पात्रता नाही- नारायण राणे


सचिन वाझेला मुख्यमंत्री ठाकरेंच अभय- नारायण राणे

नागपूरनंतर आता परभणी जिल्ह्यातही लॉकडाऊन जाहीर

परभणीत 2 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर झाला असून आज रात्री 12 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे.


स्वातंत्र्यदिन हा केवळ उत्सव नाही – मुख्यमंत्री

स्वातंत्र्यमहोत्सवानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ऑगस्ट क्रांती मैदानात उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्यदिन हा केवळ उत्सव नाही, स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले, आपण भाग्यवान आपल्याला स्वातंत्र्य आयतं मिळाले आहे. ७५ वर्ष झाली पण आपण सुराज्या आणू शकलो का? असा प्रश्न उपस्थित करत या स्वातंत्र्याचे सुराज्यात रुपांतर करु ही शपथ घेऊन आपण या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिशेने वाटचाल करुया असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.


लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा -२०२० पुढे ढकलण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रक गुरुवारी जारी केले होते. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांनी रस्त्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. दिवसभराच्या गदारोळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी शनिवारी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल असे सांगितले होते. यानुसार लोकसेवा आयोगाने सुधारित प्रसिद्धी पत्रक जारी करत येत्या २१ मार्चला एमपीएससीची परीक्षा होणार असल्याचे जारी केले आहे.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आज उद्घाटन; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आज उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला साबरमतीतून संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला मुंबईच्या ऑगस्ट मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, विधान परिषद विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर आदी उपस्थित आहेत.


MPSC सीच्या परीक्षेची आज तारीख होणार जाहीर

MPSC परीक्षा पुढे ढकल्यानंतर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी MPSC ची तारीख आजच जाहीर होणार असल्याची घोषणा केली आहे.


सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात संशयास्पद भूमिका असणारे असिस्टंट पोलीस इंस्पेक्टर सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे.


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शरद पवारांच्या भेटीला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मतदारसंदर्भातील कामांबाबत आढावा घेण्यात आला. तसेच पत्रकारांनाही कोरोना लसीकरणामध्ये सामील करण्यात यावे अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.


प्लॅस्टर ममतांच्या पायाला अन् चिंता भाजपला

पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमुल काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी चांगलाच कलंगीतुरा रंगला आहे. दरम्यान, ममतांच्या पायाला दुखापत झाल्याने आता या हल्ल्याचे राजकारण करण्यात येत आहे. यावरुन शिवसेनेच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. प्लॅस्टर ममतांच्या पायाला पण चिंता मात्रा भाजपला लागली आहे अशी खोचक टीका सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर करण्यात आली आहे.


‘संजय राठोडच्या जागी मला वनमंत्री करा!’

संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्या रिक्त जागेसाठी हरिभाऊ राठोड यांनी कंबर कसली आहे. संजय राठोड यांच्या ठिकाणी आता मला वनमंत्री करा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


Good News! कोरोना लसीची किंमत घटली

कोरोना लसीची किंमत घटली असून सध्याच्या किंमतीपेक्षा तिची किंमत २०० रुपये प्रति डोस किंमतीपेक्षा कमी असणार आहे.


बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र नसेल तरी इंजिनिअर होता येणार

इंजिनिअर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी आता गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय बारावीला आवश्यक नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन या संस्थेने घेतला आहे.


पतीचे हात खुर्चीला बांधून केली हत्या

नागपुरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. तपासादरम्यान कौटुंबिक कलहातून अनेक महिन्यांपासून विभक्त राहणाऱ्या पाचव्या पत्नीनेच पतीची हत्या केल्याची माहिती समोर आली. पतीला खुर्चीला हात बांधून शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर गळा चिरुन हत्या केल्याचे समोर आले आहे.


 Ind vs Eng T20: मोदी स्टेडियमवर रंगणार पहिला सामना

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.


गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारने एमपीएससीची (MPSC Exam ) नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर उतरुन एकच आंदोलन केले. या आंदोलनात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर देखील सहभागी झाले होते. या आंदोलकांनी तब्बल आठ तास आंदोलन करत एकच गर्दी केली होती. पोलिसांनी अनेकदा सांगूनही त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. अखेर पोलिसांनी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बळाचा वापर करुन आंदोलन मोडून काढले. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्यासह २० ते २५ आंदोनकर्त्यांवर गैर काद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांची धरपकड करण्यात आली आहे. गोपीचंद पडळकर यांच्यासह ९ जणांना अटक करण्यात आली असून २५ जणांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गर्दीत माणसांच्या चेंगरला कोरोना!

ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नागपूर, पुणे या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या भागात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे संकेत आहेत. नागपूरच्या काही भागात अंशतः लॉकडाऊन लागू करण्यातही आला आहे. प्रशासकीय आणि महापालिका यंत्रणांनीही याबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा, विरोधक आणि स्वतः नागरिकही कोरोनाच्या इशार्‍यांना आता गांभीर्याने घेत नाहीत. लोकल, बसेसच्या गर्दीत कोरोना चेंगरून मेल्याचा भ्रम अंगवळणी पडलेला आहे. (सविस्तर वाचा)


झपाट्याने वाढताहेत कोरोना रुग्ण महाराष्ट्राबद्दल केंद्र सरकारला चिंता!

देशात एकीकडे कोरोनावरील लसीकरण मोहीम वेगात सुरू असताना दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. खासकरून महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. तसेच कोरोना संसर्गाला सहजतेने घेऊ नका, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचे नवीन रुग्ण अतिशय झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकार अतिशय चिंतेत आहे. देशाला कोरोनामुक्त करायचे असेल तर सर्व जनतेने पूर्ण काळजी घेण्याची गरज आहे, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल म्हणाले. (सविस्तर वाचा)

ममतांची आत्मघातकी नौंटकी

पश्चिम बंगाल निवडणुकीची चुरस दिवसेंदिवस वाढतच आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. त्यातून आजवर आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडण्यात आल्यात. निवडणूक म्हटली की हे आलेच. पण बुधवारी मात्र निवडणूक प्रचारादरम्यान ममता यांच्या पायाला आणि मानेला दुखापत झाली. या दुखापतीचे राजकारण आता सुरू झाले आहे. ममता यांनी आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला. भाजपनेही प्रतिक्रिया देत ममता बॅनर्जी या राजकारणासाठी हल्ल्याचे खोटे वृत्त पसरवत असल्याचा आरोप केला. त्यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी भाजप नेत्यांचे एक शिष्टमंडळ कोलकात्यात निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात आले. ममता यांच्या दुखापतीची एक्सरे आणि एमआरआयव्दारे तपासणी करण्यात आली. यामध्ये ज्या उजव्या खांद्याला, मानेला दुखापत झाल्याचे एमआरआय स्कॅनमध्ये समोर आले आहे. (सविस्तर वाचा)


महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण

यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. त्यांचे वडील यशवंतराव लहान असतानाच वारले. त्यांच्या आई विठाबाई, त्यांचे बंधू ज्ञानदेव यांनी कष्ट करून घर चालवले. यशवंतराव या पुत्राने खूप शिकावे ही त्या माऊलीची इच्छा. यशवंतरावांनी शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली. त्यांनी संगीत, भजन-कीर्तन यांचाही स्वाद घेतला; कराड येथे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, लोकमान्य टिळक, ना. गोखले यांची भाषणे ऐकली. त्यांनी सालसेत असताना सत्याग्रहात भाग घेतला म्हणून त्यांना अठरा महिन्यांची शिक्षा झाली. (सविस्तर वाचा)