Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: मुंबईत जोरादार अवकाळी पावसाला सुरुवात

Live Update: मुंबईत जोरादार अवकाळी पावसाला सुरुवात

Related Story

- Advertisement -

मुंबईत आता जोरादार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.


राष्ट्रीय जनता अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची जामीन याचिका झारखंड हायकोर्टाने फेटाळली.

- Advertisement -


राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा जनता दरबार दोन आठवड्यांसाठी स्थगित


- Advertisement -

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर मुंबई पोलिस आयुक्तांच्या भेटीला


कॉ.गोविंद पानसरे स्मृतीदिनी आयोजित सभेत कन्हैया कुमारला परवानगी नाही


महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. यामध्ये अनेक मंत्र्यांचा देखील समावेश आहे. नुकतेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आले असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. नाना पटोले यांच्या मुंबईच्या घरातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यामुळे नाना पटोले यांनी स्वत:लाही विलगिरणात ठेवले आहे.


गलवान व्हॅलीतील संघर्षात चार चिनी सैनिकांचा मृत्यू

गलवान व्हॅलीत झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेत चिनी सैनिकही मरण पावल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्याबद्दल चीनने गुळणी धरली होती. अखेर पँगाँग सरोवर परिसरातून सैन्य मागे घेतल्यानंतर चीनने गलवान व्हॅलीतील संघर्षाबद्दल मौन सोडल असून, त्या घटनेत चिनी सैनिकही मारले गेल्याचं अधिकृतरित्या समोर आलं आहे. गलवानमध्ये पीएलएच्या अधिकाऱ्यांसह चार सैनिक मारले गेले होते. या चार सैनिकांना चीननं मरणोत्तर पदक दैऊन गौरवल्यानं ही माहिती समोर आली आहे.


भंडारा दुर्घटनेप्रकरणी २ परीचारीकांविरोधात गुन्हा दाखल

भंडार्‍यातील जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये लागलेल्या आगी प्रकरणी रुग्णालयाच्या दोन परिचारीकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिचारीका शुभांगी सातवणे आणि स्मिता आंबीलढुके, अशी या दोघींची नावे असून त्यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करुन तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर आज रुग्णालयातील दोन परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिचारिकांच्या निष्काळजीपणाने ही घटना घडल्याचा आरोप केला आहे.


अवकाळी पावसाचा राज्याला मोठा फटका

हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाला गुरुवारी भल्या पहाटे आणि सकाळी अवकाळी पावसाने झोडपले. मुंबईलाही या अवकाळी पावसाने झोडपले. गुरुवारी संध्याकाळी उशिराने नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आदी परिसरात काहीसा मुसळधार पाऊस पडला. तर मुंबईत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. अचानक पडलेल्या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मुंबईतील वरळी, जोगेश्वरी, चेंबूर, मालाड आदी परिसरात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. तर मुलुंड, घाटकोपर परिसरात काहीसा वाऱ्याचा जोर वाढल्याचे सांगण्यात आले.


आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


राज्यात २४ तासांत ५,४२७ नव्या रुग्णांची वाढ

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याचे आदेश सरकारकडून स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शनिवार ते सोमवार जारी करण्यात आला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ४२७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३८ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख ८१ हजार ५२०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ६६९ जणांचा मृत्यू झाला आहे.


राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण

राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह ६५ संचालकांना दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालात अजित पवार, हसन मुश्रीफ आणि ६५ संचलकांना क्लीनचिट देण्यात आली आहे. यापूर्वी SIT नेही अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेवरील ७५ जणांना क्लीन चीट दिली होती. आता सहकार विभागाच्या अहवालातही अजित पवारांना क्लीन चीट मिळाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. हा चौकशी अहवाल सहकार आयुक्तांना सादर करण्यात आला असून अजित पवारांसह ६५ संचालकांना क्लीन चीट देण्यात आली आहे.

- Advertisement -