घरताज्या घडामोडीLive Update: मनसेच्या मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे 4 मार्चला नाशिक दौऱ्यावर

Live Update: मनसेच्या मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे 4 मार्चला नाशिक दौऱ्यावर

Subscribe

मनसेची मोर्चेबांधणी, राज ठाकरे 4 मार्चला नाशिक दौऱ्यावर


अभिनेते कमल हासन यांनी कोरोना लसीचा पहिला डोस चेन्नईत घेतला.

- Advertisement -


देशात गेल्या २४ तासांत १२ हजार २८६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ९१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ११ लाख २४ हजार ५२७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५७ हजार १४८ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ७ लाख ९८ हजार ९२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मागील २४ तासांत देशातील १२ हजार ४६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या १ लाख ६८ हजार ३५८ रुग्णावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १ कोटी ४८ लाख ५४ हजार १३५ जणांनी कोरोनाची लस घेतली आहे.

- Advertisement -


केंद्रीय राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. हैदराबादच्या गांधी रुग्णालयात त्यांना कोरोनाची लस देण्यात आली.


देशात १ मार्चमध्ये २१ कोटी ७६ लाख १८ हजार ५७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल ७ लाख ५९ हजार २८३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.


अनेक देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आता जगातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ११ कोटी ४९ लाख ८६ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत २५ लाख ४९ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ९ कोटी ६ लाख ९५ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -