घरताज्या घडामोडीLive Update: राज्यात गेल्या २४ तासात ६९७१ कोरोना रुग्णांची नोंद

Live Update: राज्यात गेल्या २४ तासात ६९७१ कोरोना रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात कोरोना फोफावतोय, गेल्या २४ तासात ६९७१ कोरोना रुग्णांची नोंद

आज राज्यात गेल्या २४ तासामध्ये ६९७१ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर २४१७ कोरोनाबाधित रुग्णांची कोरोनाशी झुंज यशस्वी पार पाडून घरी परतले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण कोरोना रुग्णांचा आकडा २१,००,८८४ वर पोहोचला आहे. तर एकूण ५१७८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २४ तासात ६९७१ कोरोना रुग्णांची नोंद

- Advertisement -

मुंबईत २४ तासांत आढळले ९२१ कोरोनाबाधित रुग्ण

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढतच आहे. मुंबईत रविवारी ९२१ रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन लाख १९ हजार १२८ वर पोहचला आहे. रविवारी चार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११ हजार ४४२ वर पोहचला आहे. ५४०रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या दोन लाख ९९ हजार ५४६ वर पोहचली आहे. मुंबईत सध्या ७२७६सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी ३४६दिवस इतका आहे. मुंबईत २४ तासांत आढळले ९२१ कोरोनाबाधित रुग्ण

- Advertisement -

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह

घरात बंद करुन ठेवणे कोणालाही आवडणार नाही – मुख्यमंत्री

आपण सर्वच मागील वर्षापासून कोरोनाशी लढतो आहे.

कोरोना लसीकरणला सुरुवात झाली आहे. हि दिलासादायक बातमी आहे.

९ लाख कोरोना योद्ध्यांना लसीकरण दिल्यानंतर घातक परिणाम आढळले नाहीत. उर्वरित योद्ध्यांनी लसीकरण करुण घ्यावे

साऊथ आफ्रिकेतून परत आलेल्या लसी देशासाठी उपयोगी, येत्या काळात मोठ्या प्रमाणात कोरोना लसी उपलब्ध होतील

कोरोना लस उपलब्ध झाल्यावर सामान्य नागरिकांना लसीकरण होणार – मुख्यमंत्री

शिवनेरीवर मुख्यमंत्री म्हणून गेलो हे माझे भाग्य आहे. छत्रपती शिवरायांनी शत्रूशी लढण्याची जिद्द, प्रेरणा दिली. त्याकाळी युद्ध तलवारी आणि ढालीने लढायचे होते. परंतु कोरोना युद्ध जिंकण्यासाठी मास्क हीच आपली ढाल आहे ती वापरुन आपल्याला लढायचे आहे.

लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे अनिवार्य – मुख्यमंत्री

जनतेला चांगली वैद्यकीय सेवा, आता सर्वांना उपचार मिळत आहेत.

कोरोनाची शिस्त मोडून चालणार नाही, राज्यात कोरोना पुन्हा डोक वर काढतोय

पाश्चिमात्य देशांतही पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे – मुख्यमंत्री

संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळण्याचे नागरिकांना आवाहन -मुख्यमंत्री

परदेशातून येणाऱ्यांना क्वारंटाईन करणार, जनतेच्या हितासाठी क्वारंटाईन करण्याचा निर्णय – मुख्यमंत्री

विवाह सोहळ्यांना गर्दी नको – मुख्यमंत्री

मुंबईत मोठ-मोठे मंगल कार्यालयात नियमावली कडक केली. बँक्वेट हॉलमध्ये नियमावली मोडल्यान मालकावर कारवाई करणार

विना मास्क आढळल्यासही कारवाई होणार

काही दिवसांपूर्वी रुग्णसंख्या कमी होती. परंतु आता पुन्हा रुग्णसंख्या वाढते आहे.

कोरोना युद्धात आरोग्य कर्मचाऱ्यांचं मोठे बलिदान, कोविड योद्ध्यांना साथ द्या

अमरावतीमध्ये हजाराच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. ही परिस्थिती वाईट आहे.

राज्यात अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण

आज महाराष्ट्रात ७ हजार नवी रुग्ण आढळले, मुंबईतील संख्या पुन्हा वाढली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली

दुसरी लाट दरवाजावर धडका घालते आहे – मुख्यमंत्री

राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध घालावे लागत आहेत.

विदर्भात रुग्णसंख्या वाढत आहे

गर्दी करणारे आंदोलने, यात्रांवर बंदी

कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी वर्क फ्रॉम होम आणि कार्यलयाच्या वेळेत विभागणी करा – मुख्यमंत्री

लॉकडाऊनबाबत ८ दिवसांत निर्णय घेणार – मुख्यमंत्री

नियम न पाळल्यास लॉकडाऊन हाच शेवटचा पर्याय – मुख्यमंंत्री

मास्क घाला लॉकडाऊन टाळा – मुख्यमंत्री


नाशिकमध्ये रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये नाशिकमध्ये उद्यापासून रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.


मुंबईत ड्रग्ज पेडलरला अटक, साडे बारा कोटींच एमडी ड्रग्ज जप्त

मुंबई पोलिांनी मोठी कारवाई केली आहे. साडेबारा कोटींच एमडी ड्रग्ज जप्त केली आहे. सांताक्रूझ परिसरामध्ये ही कारवाई पोलिसांनी केली आहे. यामध्ये पाच लाखांची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे.


अनलॉकनंतर अमरावतीत पुन्हा एकदा लॉकडाऊन

अमरावतीमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात आज रविवारी कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. तसेच मंत्री यशोमती ठाकूर यांनी स्वतः पाहणी केली होती. आज मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत १ आठवड्याचा लॉकडाऊन घोषित केला आहे.


पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा आलेख खाली गेला होता. मात्र, आता पुन्हा एकदा हा आलेख वरच्या दिशेने जाताना दिसत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच रात्री ११ नंतर बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.


विदर्भातील या तीन जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू

विदर्भातील नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, रुग्णसंख्येतही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार सुरू आहे.


एकनाथ खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना झाला आहे. यावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले पाहीजे असे उपहासात्मक विधान करत भाजप नेते गिरिश महाजन यांनी खडसेंना टोला लगावला आहे. (BJP leader Girish Mahajan slams NCP leader Eknath Khadse)


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी ७ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत.


शंशाक म्हणाला मी ‘बाबा’ झालो रे!

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहोचणारा श्री म्हणजेच सर्वांचा लाडका अभिनेता शशांक केतकर बाबा झाला आहे. नुकताच त्यांनी बाळासोबतचा फोटो एन्स्टाग्रामवर शेअर करत त्याच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. या फोटोमध्ये शशांक खूपच आनंदी दिसत आहे. मात्र, शंशाकने आपल्या बाळाचा चेहरा चाहत्यांना दिसून दिला नाही. तसेच त्यांनी हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘ऋग्वेद शशांक केतकर’, याचा अर्थ शशांकला मुलगा झाला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही.


करिना, सैफ दुसऱ्यांदा झाले आई बाबा

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान दुसऱ्यांदा आई -बाबा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये करिनाला काल रात्री दारखल करण्यात आले. त्यानंतर आज तिने गोंडस बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर येत आहे. सैफ अली खान आणि करिनाने दुसऱ्यांदा मुलगा झाला आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करिनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती. दरम्यान करिना, सैफला तैमुर हा पहिला गोंडस मुलगा आहे. सेलिब्रिटी किड्समध्ये तैमुर सर्वाधिक चर्चेत असतो. पापाराझी देखील त्याची प्रत्य़ेक झलक टिपण्यासाठी सैफ करिनाच्या घराखाली वाटत पाहत असतात.

मुंबई-शिवडी जोडणाऱ्या उन्नत मार्गाचं भूमिपूजन


नागपूर जिल्ह्यात २४ तासांत ७२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

नागपूर जिल्ह्यात २४ तासांत ७२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर सहा रुग्णांचा मृत्यू  झाला असून active रुग्णांची संख्या पोहोचली ५८३६ वर पोहोचली आहे.


जागते रहो रात्र वैऱ्याची

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून अलीकडच्या काही दिवसांपासून राज्याच्या कोरोना रुग्ण संख्येत सुमारे २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस मुंबईसाठी खूप महत्त्वाचे असतील, असा इशारा आरोग्य अधिकार्‍यांनी दिला आहे. प्रशासनाने कोरोना परतल्याचे गांभीर्य ओळखून नागरिकांवर निर्बंध आणण्यासाठी कंबर कसली आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार १२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात ३१ हजार ४७९ इतके कोरोना रुग्ण होते. हा आकडा वाढून आता ४५ हजारच्या घरात पोहचला आहे. यामुळे राज्याची चिंता वाढलीय. एकट्या मुंबईतच कोरोना रुग्ण वाढीमध्ये तब्बल ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी शहरात एकूण ८२३ नवीन रुग्ण आढळले आहेत. डिसेंबरनंतर प्रथमच एवढी मोठी वाढ झाली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना विषाणूचे ३ लाख १७ हजार ३१० रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ११ हजार ४३५ रूग्णांना आपला प्राण गमावावा लागला आहे.


सात वर्षांत भाजपने काय केले?

पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसू लागली आहे. विरोधकांकडून सरकारकडे जबाब विचारला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाच्या वाढत्या दरांसाठी आधीच्या सरकारांना जबाबदार ठरवले आहे. मोदींच्या या टीकेवरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर पलटवार केला. मागील सरकारने कमीतकमी देशांतर्गत तेल प्रकल्प तरी उभारले. तुम्ही सात वर्षांत काय केले ते सांगा, असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.


महापालिका निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढणार

राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसून राज्यात होणार्‍या आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे, असे सूतोवाच शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ‘एकत्र निवडणूक लढलो तर पदवीधर निवडणुकीप्रमाणे महापालिकांचे निकाल लागतील. ज्या भागात ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे त्या पक्षाकडे नेतृत्व सोपवू’, असे राऊत म्हणाले.


डॉक्टरने अख्खे कुटुंबच संपवले!

कर्जत तालुक्यातील राशीन येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर महेंद्र थोरात (वय 46) यांनी स्वत:सह पत्नी व दोन मुलांची जीवनयात्रा संपवण्याची खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आल्याने अहमदनगर जिल्हा हादरून गेला आहे. आत्महत्येपूर्वी डॉ. महेंद्र थोरात यांनी दरवाजाला चिठ्ठी चिटकवली होती. या चिठ्ठीत म्हटले आहे की, माझा थोरला मुलगा कृष्णा ( वय 18) याला कानाने ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासासारखे वाटत आहे. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित आहोत. कृष्णाचेही कशात मन लागत नाही. हे आम्ही वडील व आई म्हणून दु:ख सहन करू शकत नाही. म्हणून मी व माझी पत्नी वर्षा (वय 39) आत्महत्येसारखे कृत्य करत आहोत. हे योग्य नसले तरी नाईलाजास्तव हे कृत्य करीत आहे. यात कोणालाही जबाबदार धरू नये, असा या चिठ्ठीत उल्लेख केला आहे. डॉ. थोरात यांचा धाकटा मुलगा कैवल्य हा आठ वर्षांचा होता. तोही या घटनेत मयत झाला आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -