घरताज्या घडामोडीLive Update: शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा नाही, पुढील बैठक ४ जानेवारीला

Live Update: शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा नाही, पुढील बैठक ४ जानेवारीला

Subscribe

सुबोधकुमार जयस्वाल सीआयएसएफचे नवे चीफ

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची बदली करण्यात आली आहे. सुबोधकुमार जयस्वाल सीआयएसएफचे नवे चीफ असणार आहेत.

- Advertisement -

ITR भरण्याची तारिख वाढवली

ITR भरण्याची तारिख आता वाढवण्यात आली आहे. १० जानेवारी पर्यत ITR भरता येणार आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा नाही, पुढील बैठक ४ जानेवारीला

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या मागणीवर शेतकरी आणि सरकारवर ५ तास चर्चा सुरू होती. मात्र त्यात कोणाताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढील बैठक ४ जानेवारीला होणार असल्याची माहिती केंद्र कृषीमंत्री तोमर यांनी दिली.


MPSC परिक्षा देणाऱ्यांच्या संधीत वाढ

MPSC परिक्षा देणाऱ्यांच्या संधीत वाढ करण्यात आली आहे. आता खुल्या गटातील उमेदवारांना ६ वेळा परिक्षा देण्याची संधी मिळणार आहे.


कुर्ल्यात तीन मजली घर कोसळल्याचे समोर आले आहे. कसाईवाडीतील करामत अली रोड येथे इमारत कोसळल्याची  घटना घडली आहे. या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या दाखल झाल्या असून दोन जखमी व्यक्तींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


टीआरपी घोटाळ्यामध्ये अटक झालेल्या पार्थो दासगुप्ताची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. पार्थो यांच्यावतीने जामीनासाठीचा अर्ज सादर दाखल केला असून १ जानेवारीला मुंबई मुख्य महानगर दिंडाधिकारी कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.


सरकारसोबत चर्चा करण्यासाठी शेतकरी नेत्यांचे शिष्टमंडळ विज्ञान भवन येथे पोहोचले


कोविडच्या पार्श्वभूमीवर मिशन बिगीन अगेन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत लागू राहील. राज्य शासनाचे आदेश जारी, कंटेन्मेंट झोनचे नियम कायम राहतील. राज्य सरकारच्या नवीन गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.


राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा रामा भरणे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात ४ मुले, ३ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


देशात गेल्या २४ तासांत २२ हजार ५५० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २८६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच २६ हजार ५७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २ लाख ४४ हजार ८५३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४८ हजार ४३९ जणांचा मृत्यू झाला असून ९८ लाख ३४ हजार १४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच देशात सध्या २ लाख ६२ हजार २७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


ब्रिटनहून भारतात परत आलेल्या एकूण २० प्रवाशांना कोरोनाची लागण झाली असून यांच्यात नवीन कोरोनाचा स्ट्रेन आढळला आहे.


संपूर्ण जग कोरोना व्हायरसमधून सावरत नाही तोवर कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा काही देशात फैलाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे जगातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ८ कोटी २३ लाख पार झाली आहे. यापैकी आतापर्यंत १७ लाख ९५ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ कोटी ८३ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -