घरताज्या घडामोडीLive Update: परीक्षा आणि सणांच्या दिवशी मतदान होणार नाही - निवडणूक आयोग

Live Update: परीक्षा आणि सणांच्या दिवशी मतदान होणार नाही – निवडणूक आयोग

Subscribe

कोरोनाचे नियम पाळून निवडणूक होणार आहेत. २ मे रोजी पाचही राज्यातील निवडणुकांचा निकाल लागले. आसाममध्ये तीन टप्प्यांत निवडणुका होणार असून सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदान २७ मार्चला होणार आहे. परीक्षा आणि सणांच्या दिवशी मतदान होणार नाही, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली. सविस्तर वाचा 


संजय राठोड प्रकरणी आता भाजप आक्रमक होत आहे. उद्या राज्यभरात भाजपचा चक्का जाम आंदोलन असणार आहे.

- Advertisement -

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ मोटारिचा मालक मिळून आला आहे. या गाडीचा मालक मनसुख हिरेन याला मुंबई क्राईमब्रांने अटक केली असून त्यानंतर याला सीआययु कार्यालयात नेऊन सचिन वाझे यांच्याकडे जबाब नोंदवण्यात आला आहे.


मुंबईत आढळलेल्या स्फोटकाप्रकरणी चर्चा करण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात दाखल

- Advertisement -

नागपूरकरांनी शनिवारी, रविवारी घराबाहेर पडू नका, जिल्ह्यातील बाजारपेठा राहणार बंद- ऊर्जामंत्री नितीन राऊत


बंगाल, आसाम, केरळ राज्यातील निवडणुका तारखा आज होणार जाहीर


राठोड प्रकरणी सुभाष देसाईंनी जोडले हात, पुजा चव्हाण प्रकरणी सुभाष देसांईंनी भाष्य करणे टाळले.


सरकारची बदनामी होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज, विधिमंडळ अधिवेशनापूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता


इंधन दरवाढ, जीएसटी, ई-वे बिल या मुद्द्यांवर व्यापाऱ्यांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशभरातील जवळपास 8 कोटी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जवळपास 40 हजार व्यापारी संघटनांनी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (सीएआयटी) ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला आहे. हा बंद वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या तरतुदींचा आढावा घेण्याच्या मागणीसाठी केला जात आहे.


अभिनेता ऋतिक रोशनला मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययुकडून समन्स बजावण्यात आला आहे. ऋतिक रोशन यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कंगना प्रकरणात समन्स बजावण्यात आला. शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स, ऋतिक रोशन याने अभिनेत्री कंगना विरोधात तक्रार केली आहे. ऋतिक याच्या तक्रारी नुसार मुंबई क्राईम ब्रांच तपास करत आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -