घरताज्या घडामोडीLive Update: नाना पटोले आणि राहुल गांधी यांची भेट

Live Update: नाना पटोले आणि राहुल गांधी यांची भेट

Subscribe

नाना पटोले आणि राहुल गांधी यांची भेट

- Advertisement -

तळोजा औद्योगिक क्षेत्रात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


राज कुंद्रा यांच्या कंपनीच्या संचालकाला अटक

- Advertisement -

कुख्यात गँगस्टार एजाज लकडावाला अटकेत


पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला अटक

२६ जानेवारी रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या दंगलीमध्ये मुख्य आरोपी असलेल्या अभिनेता दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. सिद्धूची माहिती देणाऱ्यासाठी पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दरम्यान, आज सिद्धूला अखेर अटक करण्यात आली आहे.


खलिस्तान समर्थक दहशतवाद्याला नांदेडमध्ये अटक

सरबजित सिंग किरट या दहशतवाद्याला नांदेडमध्ये अटक करण्यात आली आहे. खलिस्तान संघटनेसाठी पैसे जमा करायचा असा त्याच्यावर आरोप करण्यात आला असून काही हिंदू नेत्यांना ठार मारण्याचा त्याचा प्रयत्नात होता अशी माहिती मिळत आहे.


पहाटेच्या अंधारतला शपथविधी उघडपणाच्या कोणत्या व्याख्येत बसतोय, सामनातून टीका

शिवसेनेला कोणतेही वचन दिले नव्हते, बंद दाराआड चर्चा केली नव्हती. जे करतो ते उघडपणे ‘डंके की चोट’पर करत, बंद खोलीत काहीही करत नाही. तसेच शिवसेनेच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेना उरलीच नसती असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले होते. यावर आज सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. पहाटेच्या अंधारतला शपथविधी उघडपणाच्या कोणत्या व्याख्येत बसतोय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.


पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

गुरूवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता आहे.


जीएसटी विरोधात २६ फेब्रुवारीला व्यापाऱ्यांचा ‘भारत बंद’

जीएसटी ही एक अनुत्तीर्ण करपद्धती असल्याचा आरोप व्यापारांकडून केला जात आहे. दरम्यान  जीएसीटमुळे व्यापाऱ्यांना त्रास होतो त्यामुळे कर पद्धती साधी आणि सोपी करण्याच्या मागणी कडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जीएसटी विरोधात २६ फेब्रुवारीला व्यापाऱ्यांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.


पंतप्रधान मोदींचा पहिल्यांदाच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना फोन

अमेरिकेचे राष्ट्राध्यपदी नवी जबाबदारी सांभाळणाऱ्या जो बायडन यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच संवाद साधला. पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये प्रादेशिक मुद्दे आणि हवामान बदलावर दोन्ही राष्ट्र एकमेकांना सहकार्य करतील असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.



नाशिक पुन्हा गारेगार, पारा ९.२ अंशावर

शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून सोमवारी नाशिकमध्ये सर्वात कमी ९.२ अंश, तर निफाडमध्ये ७.२ अंश सेल्सिअस अंशापर्यंंत तपमानाची नोंद झाली. उत्तरेकडून येणार्‍या शीतलहरींचा वेग वाढल्यामुळे आता उत्तर महाराष्ट्रही गारठण्यास सुरुवात झाली आहे.


ठाणे-घोडबंदर रोडवर गॅस टँकरचा मोठा अपघात

ठाणे घोडबंदर रोडवर गॅस टँकरचा अपघात झाला आहे. या अपघातामुळे मध्यरात्री काही तास ठाणे-घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी आणि वाहतूक पोलिसांची १ रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी पोहोचली. सुदैवाने अपघातात कोणही जखमी झालेले नाही.


वसई-विरार पालिका हद्दीतून २९ गावे वगळणार

वसई विरार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असताना राज्य सरकारने महापालिकेतून २९ गावे वगळण्याची ठाम भूमिका घेतली आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच गावे वगळण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुंबई हायकोर्टात सुरू असलेल्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती हायकोर्टाला करावी, अशी सूचना अवर सचिवांनी सरकारी वकिलांना केली आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -