राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक सुरू आहे.
जालना जिल्हात सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. शिवाय शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. तर दहावी आणि बारावीची वर्ग वगळता ५वी ते ९वीचे वर्ग ३१ मार्चपर्यंत बंद असणार आहेत. फळ विक्रेते, रिक्षा चालक यांची अँटीजनक स्टेट केली जाणार आहे. तसेच कोरोना नियमांचे न पालन करणाऱ्या लोकांवर देखरेख ठेवण्यासाठी पोलीस आणि नगरपालिकेच्या वतीने सयुक्त पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यातून विदर्भातील ११ जिल्ह्यात जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच परभणी जिल्ह्यातील धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद असणार आहेत.
राठोड पोहरादेवी जवळ पोहचले
वनमंत्री संजय राठोडांच्या स्वागतासाठी पोहरादेवी गडावर समर्थकांची गर्दी
वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीकडे रवाना
कोरोनाच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्र्यांची आयुक्तांसोबत आज वर्षा बंगल्यावर आढावा बैठक, सायंकाळी ४.३० ते ५.३० यादरम्यान ही बैठक पार पडणार आहे.
रेणुका माता मंदिर बंद ठेवण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय
वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनाला
आज संजय राठोड यांचं शक्तीप्रदर्शन नाही, पोहोरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांचे वक्तव्य