घरताज्या घडामोडीLive Update : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Live Update : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

पर्यावरण मंत्री आदित्या ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे.

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अत्यंत खळबळजनक खुलासा करत सचिन वाझे प्रकरणात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या दाव्यानुसार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्यापोटी १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा खळबळजनक खुलाला परमबीर सिंह यांनी केला आहे.प्रत्येक महिन्यापोटी १०० कोटी रूपये गोळा करण्याचे आदेश खुद्द गृहमंत्र्यांनीच दिले होते या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. (सविस्तर वाचा)


कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात २१ मार्चपर्यंत कडक निर्बंध लावले होते. आज कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा सर्वपक्षीय आढावा बैठक घेतली. तज्ज्ञांची मतं जाणून घेतली, व्यापारी वर्गाचीही मतं लक्षात घेतली. ज्या सूचना मिळाल्या त्याला अनुसरुन सध्या सुरु असलेले निर्बंध ३१ मार्चपर्यंत सुरु राहणार आहेत, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.

- Advertisement -

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता NIA करणार आहे. हिरेन प्रकरणाचा तपास आतापर्यंत ATS करत होतं. वाझे ज्या सोसायटीत राहत होते त्या साकेत सोसायटीत NIA ची टीम दाखल झाली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट देत पाहणी केली. ICMR मार्गदर्शनाखाली भारत बायोटेक जी कोरोना लस बनवत आहे. तिचं उत्पादन महाराष्ट्रात करु इच्छितो, तर त्याला परवानगी द्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली होती. यावर पंतप्रधान मोदींनी याबाबतचा प्रस्ताव द्या त्याला मंजूरी देतो, असं सांगितलं होतं. त्यामुळे आता परवानगी मिळाल्यानंतर हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये लसीचं उत्पादन केलं जाणर आहे.


अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु असताना अजून एक मोठी घडामोड घडली आहे. मुंब्रा रेतीबंदर जिथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता तिथेच अजून एक मृतदेह सापडला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेतला आहे.


देशात गेल्या २४ तासांत ४० हजार ९५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. २३ हजार ६५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर १८८ जणांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत १ कोटी १५ लाख ५५ हजार २८४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १ कोटी ११ लाख ०७ हजार ३३२ जण बरे झाले आहेत. २ लाख ८८ हजार ३९४ सक्रिय रुग्ण आहेत. आता पर्यंत १ लाख ५९ हजार ५५८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४ कोटी २० लाख ६३ हजार ३९२ जणांना लस देण्यात आली आहे.


घरडा केमिकलमध्ये मोठा स्फोट, पाच कामगारांचा मृत्यू

रत्नागिरी खेड (MIDC) घरडा केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला. कंपनीतील 7b प्लांटमध्ये एका पाठोपाठ दोन स्फोट झाले. ४० ते ५० जण आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाच कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून शिरपूर येथील शिक्षकाने आत्महत्या केली. सावळदे फाटा येथून तापी नदीत उडी मारुन आत्महत्या केली. नदीच्या पुलावर मोटारसायकल आणि दवाखान्याची फाईल आढळून आली.


आज शनिवारी पहाटे मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील पिकांचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठवाड्यासह विदर्भ आणि राज्यातील अन्य भागातही १८ ते २१ मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.


शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि नेते संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आज ते सेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेणार असून संघटनात्मक आढावा देखील घेणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकांकच्या पार्श्वभूमीवर बैठक असल्याची माहिती मिळत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -