घरCORONA UPDATECovid19 Vaccine: इंजेक्शन ऐवजी गोळीतून लस देण्याची तयारी, कसं असेल स्वरुप...

Covid19 Vaccine: इंजेक्शन ऐवजी गोळीतून लस देण्याची तयारी, कसं असेल स्वरुप जाणून घ्या

Subscribe

एंडरसन यांच्या इनहेलर लसीचे स्वरुप एका पावडरच्या स्वरुपात असेल. जी पावडर लोक सहजपणे आपल्या घरी आणू शकतील.

कोरोना (Covid19 ) व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जगभरात लसीकरण (Covid19 Vaccine)  मोहिम हाती घेतली आहे. लसीकरण मोहिमेला चांगलाच वेग आलाय. इंजेक्शनच्या स्वरुपात कोरोना विरोधी औषध दिले जात आहे. मात्र भविष्यात लोकांना टॅबलेट (गोळी) किंवा इनहेलरच्या स्वरुपात कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे. अशाप्रकारच्या कोरोना लस तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. बीसीसीच्या रिपोर्टनुसार, स्वीडनच्या सर्वात मोठ्या सायन्स पार्कमध्ये इन्जेमो एंडरसन यांच्या नेतृत्वात अशाप्रकारच्या लसीचे काम सुरु आहे. (Covid19 Vaccine: Preparing to be vaccinated by pill instead of injection)  ते प्लॅस्टिकचे एक स्लीम इनहेलर तयार करत आहे ज्याचा आकार माचिसच्या बॉक्सच्या आकाराहून कमी असले. एंडरसन यांना विश्वास आहे की, हा छोटा इनहिलर कोरोना विरोधी लढाई जिंकण्यासाठी सर्वाधिक प्रभावी ठरेल आणि पुढील काळात हे कोरोना विरोधात लढण्यासाठीचे एक महत्त्वाचे हत्यार असेल.

 

- Advertisement -

Iconovo नावाच्या एका कंपनीने स्टॉकहोमच्या एका इम्यूलॉजी रिसर्च स्टार्टअप IRS सोबत करार करुन कोरोना विरोधी एक ड्राय पावडर विकसित केली आहे. ही लस ४० डिग्री सेल्सियसमध्ये ठेवता येईल. WHO कडून मान्यता मिळालेली कोणतीही लिक्विड फॉर्म लस स्टोर करण्यासाठी अनेक समस्यांना समोरे जावे लागते. एका मजबूत जारमध्ये -७० डिग्री सेल्सियस तापमात ठेवावी लागते अन्यथा लसीची प्रभावशीलता कमी होते.

- Advertisement -

इनहेलर लसीचे स्वरुप कसे असेल?

एंडरसन यांच्या इनहेलर लसीचे स्वरुप एका पावडरच्या स्वरुपात असेल. जी पावडर लोक सहजपणे आपल्या घरी आणू शकतील. अगदी सहज,सोपी आणि स्वस्तात प्रोड्यूस होणारी ही प्रक्रिया आहे. कोरोना व्यतिरिक्त याचा वापर अस्थमाच्या रुग्णांवर देखील करण्यात येऊ शकतो.

इनहेलर लसीचा वापर कसा कराल?

या इनहेलरवर एक छोटी प्लॅस्टिक स्लिप चिकटलेली असेल. ती स्लिप काढून टाकल्यास इनहेलर अँक्टिव्ह होईल. त्यानंतर इनहेलर तोंडाला लावून श्वास घ्यावा. ही इनहेलर लस फुफ्फुसापर्यंत आपला प्रभाव दाखवेल, असे फर्म जोहन वोबोर्ग यांनी म्हटले आहे.

 


हेही वाचा – Corona: कोरोनामुळे जगातील १५ लाख मुलांचं पालकांचं छत्र हरपलं

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -