घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: 'कोरोना व्हायरस'चं नाव घेतल्यावर होणार गुन्हा दाखल!

CoronaVirus: ‘कोरोना व्हायरस’चं नाव घेतल्यावर होणार गुन्हा दाखल!

Subscribe

जगभरात कोरोना व्हायरस प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना आपण पाहत आहोत. या महामारीमुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण पसरले आहे. जगात असलेल्या सर्व देशांमधील लोकांच्या तोंडावर या खतरनाक व्हायरस नाव आहे. मात्र एका देशाला कोरोना व्हायरस हा शब्द ऐकायचा नाही आहे. तसंच या देशातील नागरिकांना हा शब्द बोलण्यास देखील परवानगी नाही आहे. हे खरं आहे. तुर्कमेनिस्तान या देशातील सरकारने कोरोना व्हायरस या शब्दासह मास्क वापरण्यावर देखील बंदी घातली आहे.

तुर्कमेनिस्तान सरकारने स्थानिक मीडिया किंवा आरोग्य माहिती पुस्तिकेमध्ये कोरोना व्हायरस या शब्दाचा वापर करण्यास बंदी घातली आहे. इंडिपेन्डंट न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार ‘तुर्कमेनिस्तान क्रोनिकल’च्यातून सांगितलं की, या झपाट्याने पसरणाऱ्या आजार रोखण्याविषयी माहिती असलेल्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीपत्रकात कोरोना व्हायरस उल्लेख केलेला नाही.

- Advertisement -

तसंच पोलीस देखील या संसर्गजन्य रोगाची चर्चा करण्याऱ्या लोकांना देखील ताब्यात घेत आहेत. पोलीस साध्या कपड्यात लोकांमध्ये वावरत आहेत आणि त्यांची गुपचूप चर्चा ऐकत आहे. जेणे करून कोरोना व्हायरस बद्दल बोलणाऱ्या व्यक्तीची ओळख पटून शकेल. कोरोना व्हायरसबाबत लाखो नकारनंतरही तुर्कमेनिस्तानची सरकार व्हायरस प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करीत आहेत. स्थानकांवर तपासणी करण्याचे मशीन लावले जात आहेत. तसंच गर्दीच्या ठिकाणी स्वच्छता केली जात आहे.

रिपोर्टर विथ बॉर्डर्सचे प्रमुख जीन कॅवेलियर म्हणतात की, कोरोना व्हायरसच्या बंदीमुळे तुर्कमेनिस्तानमधील लोक धोक्यात येतील. दरम्यान सरकारी वृत्तसंस्था टीडीएचने म्हटले की, तुर्कमेनिस्तानमधील विद्यार्थ्यांसह नागरिकांना विशेष विमानाने त्यांच्या देशात आणले जाईल. याची सर्व व्यवस्था केली आहे.

- Advertisement -

टीडीएचच्या मते, कोणत्याही देशातून या रोगाची लागण होऊ नये. यासाठी सरकारने कित्येक गंभीर उपाययोजना केल्या आहे. सीमारेषांवर आणि अन्य आवश्यक ठिकाणी खबरदारी घेतली जात आहेत. तसंच प्रतिबंधात्मक उपाय आणि जगजागृती केली जात आहे.


हेही वाचा – CoronaVirus:अमेरिका, तुला चीनवर भरवसा नाय का? का नाय?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -