सव्वा एक लाखांचं शेण गेलं चोरीला

कर्नाटकामध्ये सव्वा एक लाख रुपयांचं शेण चोरीला गेलं होतं. पशूविकास विभागाच्या पर्यवेक्षकाने ही चोरी केली होती, असे पोलिसांच्या तपासणीत उघड झाले आहे.

Cow dung worth
शेण गेलं चोरीला

चोरटे काय चोरतील याचा नेम नाही. कर्नाटकातील चोरांनी चक्क शेण पळवलं आहे. पैशांसाठी त्यांनी ही चोरी केली असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणदे ही चोरी करणारे सरकारी कर्मचारी असल्याचे उघड झाले आहे. चोरी केलेल्या शेणाची किंमत तब्बल सव्वा एक लाख रुपये इतकी आहे. पशूसंवर्धन खात्याने यासंबंधी तक्रार नोंदल केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

कर्नाटकाच्या बिरुर जिल्ह्यातील चिक्कमंगळूर या गावात हा प्रकार घडला आहे. या गावातील एका व्यक्ती पशूविकास खात्याच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्याने अधिकाऱ्यांना सांगितले की, मी ३५ ते ४० ट्रॅक्टर एवढं शेण एका गोदामामध्ये पाहिलं आहे. या व्यक्तीने दिलेल्या या माहितीनंतर फशूविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्या गोदामाची पाहणी केली असता त्या गोदामात खरच शेण निघालं. त्यानंतर पशूविकास अधिकाऱ्यांनी यासंबंधी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केल्यावर त्यांना पशूविकास विभागाच्या पर्यवेक्षकावर संशय आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता घाबरुन पर्यवेक्षकाने आपला गुन्हा मान्य केला. यानंतर या गुन्ह्याचा तपास लावत असताना ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर हे शेत ओतण्यात आले आहे, त्याचाही या चोरीमध्ये समावेश होता, असे समोर येत आहे. पर्यवेक्षक हे शेण विकणार होता.


हेही वाचा – कर्नाटक : कारवार समुद्राध्ये बोट बुडून सहा जणांना जलसमाधी