Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE CoWin App: कोविन पोर्टल क्रॅश, ८ तासांपासून भारतीय पाहत आहेत रजिस्ट्रेशनची वाट

CoWin App: कोविन पोर्टल क्रॅश, ८ तासांपासून भारतीय पाहत आहेत रजिस्ट्रेशनची वाट

उत्साहात रजिस्ट्रेशन करायला गेले मात्र हिरमोड झाला

Related Story

- Advertisement -

देशात १ मे पासून १८ वर्षांवरील लोकांना लसीकरण केले जाणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मात्र देशात अपुऱ्या लससाठ्यामुळे १५ मे पासून लसीकरण सुरु केले जाणार आहे. लसीकरणासाठी आधी कोविन अँप किंवा वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले जाणे महत्त्वाचे आहे. देशातील १.३ कोटी लोक गेल्या ८ तासांपासून कोविन पोर्टलवर लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करत आहेत. मात्र रजिस्ट्रेशन होत नाही. रजिस्ट्रेशन करताना साईट क्रॅश होणे, ग्रीच होणे, पुन्हा पहिल्या पासून रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु होणे अशा अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. १८ वर्षांवरील लोकांना लस मिळणार यासाठी तरुण मंडळी उत्साही होती. उत्साहात रजिस्ट्रेशन करायला गेले मात्र त्यांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले आहे. कोविन पोर्टल डाऊन झाल्याने लोक सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यावर संताप व्यक्त करत आहेत.

कोविन पोर्टवर रजिस्ट्रेश करणाऱ्या काहींचे रजिस्ट्रेशन पटकन झाले मात्र काही जण अजूनही प्रयत्न करत आहेत. साईड क्रॅश झाल्याने अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. अनेकांनी बऱ्याच वेळा साइन अप करण्याचा प्रयत्न केला मात्र ते अयशस्वी झाले. काहींचे रजिस्ट्रेशन झाले आहे मात्र त्यांना स्लॉट देण्यात आला नाही. या सर्व तांत्रिक कारणांमुळे देशातील अनेक तरुणांचे लसीसाठी रजिस्ट्रेशन होऊ शकले नाही.

- Advertisement -

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य अधिकारी आर.एस. शर्मा यांनी एनआयए वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, बऱ्याच राज्यात आणि रुग्णालयात १ मे नंतर लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे कदाचित १ मे नंतर लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन होऊ शकेल.

आरोग्य मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे की, सर्व्हर क्रॅश झाले हे खोटे आहे. बुधवारी संध्याकाळी ४ ते ७ यावेळेत ८० लाख भारतीयांनी लसीसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. त्याचप्रमाणे दिवसाला १.३ कोटी रजिस्ट्रेशन करुन २.७८ कोटी लोकांना एसएमएस पाठवून रजिस्ट्रेशन बंद केले.


- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाचा उद्रेक! देशात २४ तासांत ३ लाख ७९ हजार २५७ नवे रुग्ण, ३६४५ जणांचा मृत्यू

 

 

- Advertisement -