घरCORONA UPDATEलसीकरणाच्या नोंदणीला सुरुवात होताच CoWIN App ची वेबसाईट क्रॅश

लसीकरणाच्या नोंदणीला सुरुवात होताच CoWIN App ची वेबसाईट क्रॅश

Subscribe

देशात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण १ मे पासून सुरु होणार आहे. यासाठी आज बुधवारी ४ वाजल्यापासून कोविन पोर्टलवर नलसीकरणासाठी नोंदणी सुरु झाली आहे. चार वाजता नोंदणी प्रक्रिया सुरू होताच को-विन अ‍ॅप पोर्टल क्रॅश झालं आहे. कोविन अ‍ॅप ओपन होत नसल्याची अनेकांनी तक्रार केली आहे. १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी को-विन अ‍ॅपवर नोंदणी करणं आवश्यक आहे.

लसीकरण करू इच्छिणारे कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतु अ‍ॅपद्वारे नोंदणी करु शकतात.

- Advertisement -

कोविनवर याप्रमाणे नोंदणी करा

१. सर्व प्रथम आपल्याला को-विन पोर्टलवर जावं लागेल. तिथे आपल्याला ‘स्वतः नोंदणी करा / साइन इन करा’ टॅबवर क्लिक करावं लागेल.

२. यानंतर, आपल्याला आपला मोबाइल नंबर प्रविष्ट करावा लागेल आणि ‘ओटीपी’ वर क्लिक करावे लागेल.

- Advertisement -

३. मोबाइलवर ओटीपी आल्यानंतर आपण तो क्रमांक तेथे टाकावा लागेल.

४. पडताळणीनंतर, ‘लसीकरम नोंदणी’ पान उघडेल.

५. येथे आपल्याला आपली वैयक्तिक माहिती भरावी लागेल. यात आपणास फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी क्रमांक, नाव, लिंग, जन्म तारीख भरावी लागेल.

६. आपण ही कागदपत्रे फोटो आयडी म्हणून वापरू शकता- आधार कार्ड

  • चालक परवाना
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • पेन्शन पासबुक
  • एनआरपी स्मार्ट कार्ड
  • मतदार ओळखपत्र

७. एकदा नोंदणी झाल्यावर आपण ‘Account details’ वर जा. येथे आपण आपले वेळापत्रक ठरवू शकता.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -