Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग CoWIN पोर्टलवर सेकंदाला ५५ हजार तर मिनिटाला २७ लाख हिट्स

CoWIN पोर्टलवर सेकंदाला ५५ हजार तर मिनिटाला २७ लाख हिट्स

तीन तासांमध्ये ८० लाख लोकांनी केली CoWIN एपवर नोंदणी

Related Story

- Advertisement -

प्रौढांसाठी आज बुधवार २८ एप्रिलपासून कोरोना लसीकरणासाठीचा CoWIN एपवर नोंदणीचा पर्याय आजपासून खुला झाला. पण जशी ही नोंदणी प्रक्रिया दुपारी ४ वाजता सुरू झाली, तोच केंद्राच्या कोविन एपच्या वेबसाईटला मोठा दणका बसला. एका मिनिटाला २७ लाख हिट्स इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने या वेबसाईट एक्सेससाठी अनेक अडथळे यायला सुरूवात झाली. सेकंदाला ५५ हजार हिट्स मिळाल्याची माहिती नॅशनल हेल्थ ऑथोरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर एस शर्मा यांनी ट्विट करून दिली. अवघ्या तीन तासांमध्ये ८० लाख युजर्सने नोंदणी केल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये नमुद केले आहे. सुरूवातीला या वेबसाईटवर मालफंक्शन एरर झाला होता असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण मोठ्या प्रमाणात या साईटवर युजर्स आल्यानेच वेबसाईटला अडचणी निर्माण झाल्या असाव्यात असे बोलले जात आहे. पण काही मिनिटातच या साईटवर आलेले अडथळे दूर करण्यात आले. त्याआधी अनेकांनी रात्री १२ वाजल्यापासूनच नोंदणीचा प्रयत्न केला होता, पण आरोग्य मंत्रालयाकडूनच १८ वर्षे वयोगटासाठीची नोंदणी ४ वाजल्यापासून सुरू होईल असे स्पष्ट करण्यात आले.

काय होता Error मॅसेज ?

- Advertisement -

CoWIN वेबसाईटवर राज्य सरकारच्या आणि खाजगी लसीकरण केंद्रासाठीचे स्लॉट्स (वेळा) या एपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतात. साईटवर नोंदणीसाठी दुपारनंतर ४ वाजता सुरूवात झाली. पण त्यावेळी अनेकांना नोंदणी झाल्यानंतरही स्लॉट्स उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळेच काही वेळाने हे स्लॉट्स अपडेट करण्यात येतील, त्यामुळे पुन्हा लॉग इन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटाच्या दरम्यान Covid-19 लसीकरणाला सुरूवात होणार आहे. ज्यांना लस घ्यायची आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीनेच नोंदणी करावी लागणार आहे. कोविनच्या https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर नोंदणीसाठीचा किंवा साईन इनचा पर्याय आहे. जेव्हा अनेकांनी एकाचवेळी ४ वाजता या साईटवर लॉग इन केले, त्यावेळी अनेकांना एक मॅसेज वेबसाईटवर दिसला. या मॅसेजमध्ये नमुद करण्यात आले होते की, “CoWIN server is facing issues. Please try later.”

पण त्यावर खुलासा म्हणून आरोग्य सेतूच्या माध्यमातून ट्विट करण्यात आले की, आता कोविन वेबसाईटवर नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे कोविन पोर्टल काम करत असून, ४ वाजता आलेला छोटा अडथळा आता दूर झाला आहे, असेही ट्विटमध्ये नमुद करण्यात आले. त्यामुळे १८ वर्षे वयोगटावरील व्यक्ती आता नोंदणी करू शकतात असेही ट्विटमध्ये नमुद करण्यात आले. त्यानंतर साईटवर सुरळीत एक्सेस मिळू लागल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. त्यामुळे अनेकांना नोंदणी करणे शक्य होत आहे. अनेकांना सुरूवातीला ओटीपी येण्यासाठीही अडथळे निर्माण होत होते. अनेकदा मोबाईल नंबर नमुद करूनही वेबसाईटवर एक्सेस मिळणे कठीण झाल्याचाही काही जणांचा अनुभव आहे. तर ओटीपीचा पर्यायही येत नसल्याचा काहींचा अनुभव सुरूवातीला होता.


- Advertisement -

 

- Advertisement -